मुंबई : बॉलिवुड अभिनेता सलमान खानचा वाढदिवस 27 डिसेंबर रोजी आहे. तो या दिवशी आपला 58वा जन्मदिवस साजरा करणार आहे. आता अनेकांना ही आशा आहे की, सलमानच्या वाढदिवशी त्यांना काहीतरी गिफ्ट मिळू शकते. आता एक बातमी समोर आली आहे. 'भाईजान'च्या वाढदिवसाच्या दिवशी 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर हा रिलीज होऊ शकतो. याशिवाय या टीझरचा रनटाईम देखील समोर आला आहे. 'सिकंदर'चा टीझर हा 80 सेंकदाचा असणार आहे. तसेच या चित्रपटामधील काही दृश्य देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एआर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
सलमान खानचा 'सिकंदर'मधील फर्स्ट लूक : सध्या 'सिकंदर' या चित्रपटावर खूप वेगानं काम सुरू आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान 'बेबी जॉन'च्या प्रमोशनसाठी वरुण हा 'भाईजान'च्या शो 'बिग बॉस 18'मध्ये गेला होता. यावेळी त्यानं खुलासा केला की, सलमान खानच्या आगामी चित्रपट 'सिकंदर'मधून त्यांचा फर्स्ट लूक येणार आहे. हा लूक त्याचा 27 डिसेंबरला येईल. आता ही बातमी समोर आल्यानंतर अनेकजण 'भाईजान'चा लूक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एका रिपोर्टनुसार सलमानच्या वाढदिवशी निर्माते या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करून चाहत्यांना खुश करू शकतात. मात्र सध्या या बातमीबद्दल निर्मात्यांनी काहीही अधिकृत विधान केलेलं नाही.
Gear Up for The Madness Salmaniaaa 💥 Its Official#Sikandar Teaser on 27 December, Officially confirmed by #VarunDhawan 🙌#SalmanKhan is coming to reign his supremacy once again @BeingSalmanKhan 💥 pic.twitter.com/qJOd8CJG72
— I'm Raj..! (@TheSalmaniac_) December 21, 2024
#SikandarTeaser leaked a Salman khan photo 📸 🔥
— Meenamano15 (@meenamano15) December 23, 2024
Bhai in Mask 💥 😷 #SalmanKhan𓃵 #Sikandar pic.twitter.com/fd0O4kmuT8
#SikandarTeaser On December 27 🔥 pic.twitter.com/8ygjJ09D0J
— Let's X OTT GLOBAL (@LetsXOtt) December 23, 2024
सोशल मीडियावर सलमानचा फोटो व्हायरल : सलमान खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा फोटो आगामी 'सिकंदर' या चित्रपटाचा टीझर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोत तो फेसवर मास्क घालून असल्याचा दिसत आहे. त्याच्या पाठीमागे त्याची टीम आहे, ज्याचा चेहरा पूर्णपणे मास्कनं झाकलेला आहे. ईद 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या साजिद नाडियादवालाच्या 'सिकंदर' चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल हे कलाकार देखील त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहेत.
हेही वाचा :