मुंबई - 2024 च्या ख्रिसमसचा सण बॉलिवूड सेलेब्रिटींनी उत्सवपूर्ण भेटवस्तू, नृत्याचा आनंद आणि ग्लॅमरसह हर्षपूर्ण उत्सावात साजरा केला. याचे सुंदर फोटो शेअर करत उत्वी मोडमधील त्यांची झलक शेअर केली आहे. प्रतिष्ठित कपूर कुटुंबापासून ते क्रिती सेनॉन, डायना पेंटीपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटी सुट्टीचा हा हंगाम कसा साजरा करत आहेत यावर एक नजर टाकूया.
प्रतिष्ठित कपूर कुटुंब ख्रिसमस ब्रंचसह हा उत्सव साजरा करण्यासाठी दिवंगत शशी कपूर यांच्या घरी जमले होते. यात रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूर यांच्यासह रणधीर कपूर, नीतू कपूर, रीमा कपूर, मनोज जैन, रजत बेदी कुटुंब, कांचन केतन देसाई आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते.
नीतू कपूरनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर डिनर टेबलवर बसलेल्या कपूर कुटुंबाचं एक सुंदर पोर्ट्रेट शेअर केलं आहे, ज्यामध्ये काही लाल कपडे घातलेले होते तर काहींनी ख्रिसमसच्या टोपी घातलेल्या होत्या. "कौटुंबिक ख्रिसमस सेलिब्रेशन," असं कॅप्शन नीतू कपूर यांनी या फोटोला दिलं आहे.
'क्रू' फेम अभिनेत्री क्रिती सेनॉननं ख्रिसमस हॅट घातली असून त्यावर तिचं नाव कोरलं आहे. फोटोंच्या सुंदर संग्रहामध्ये क्रितीनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ख्रिसमस ट्री, मोहक सांता कठपुतळी आणि ख्रिसमस बॉलचे फोटो देखील शेअर केले आहेत.
'कॉकटेल' चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळविणारी अभिनेत्री डायना पेंटीनं तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ख्रिसमस ट्रीच्या पार्श्वभूमीसह काळा ड्रेस परिधान केलेली दिसली. तिनं लांब कानातले आणि काळ्या सँडलसह तिचा पोशाख मॅच केला आहे. फोटो शेअर करताना डायनानं हृदय आणि स्टार इमोजीसह "फा ला ला ला ला" असं लिहिलंय.
सोनम कपूरनं ख्रिसमसच्या आनंदी सणात तिच्या कौटुंबिक क्षणांची झलक दाखवली आहे. तिचा मुलगा वायु, पती आनंद आहुजा आणि इतर जवळचे मित्र आणि कुटुंबासह सुंदर क्षणांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोनम कपूरनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिलंय, "किती आनंदाचा ख्रिसमस! किती सुंदर महिना! मित्र आणि कुटुंब आणि खूप प्रेम!"
प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये सक्रिय आहे आणि तिचा पती निक जोनाससह यूएसएमध्ये स्थायिक झाली आहे, तिनं ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास, निक जोनास आणि तिच्या श्वानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. करिश्मा कपूरनंही तिच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली.