ETV Bharat / sports

काय आहे 'बॉक्सिंग डे टेस्ट'? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आजपासून भिडणार - BOXING DAY TEST HISTORY

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना आज 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होणार आहे. पण बॉक्सिंग डे हे नाव कसं पडलं तुम्हाला माहिती आहे का?

Boxing Day Test History
बॉक्सिंग डे टेस्ट (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 26, 2024, 1:30 AM IST

मेलबर्न Boxing Day Test History : पर्थमधील गाब्बा इथं खेळवण्यात आलेला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत. मेलबर्नमध्ये खेळली जाणारी मालिकेतील चौथी कसोटी 'बॉक्सिंग डे टेस्ट' असेल. बॉक्सिंग डे टेस्ट दरवर्षी 26 डिसेंबरपासून सुरु होते. पण तुम्हाला माहित आहे का की बॉक्सिंग डे टेस्ट कशाला म्हणतात आणि ती ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये का खेळली जाते. आज बॉक्सिंग डे कसोटीच्या इतिहासावर एक नजर टाकूया.

बॉक्सिंग डे हे नाव कसं पडलं? : बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी, बॉक्सिंग डे हे नाव कसं पडलं ते जाणून घेऊया. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. बॉक्सिंग डेच्या मागे अनेक समजुती आहेत. यापैकी एक समज असा आहे की जे लोक ख्रिसमसला सुट्टी न घेता काम करतात त्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली जाते आणि त्यांना एक बॉक्स भेट म्हणून दिला जातो. त्यामुळं 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे म्हटलं जातं.

बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास कसा : आता तुम्हाला कळले असेलच की 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे का म्हणतात. या दिवसापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास अनेक दशकांचा आहे. 1950 मध्ये, ॲशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न इथं पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळली गेली. तेव्हापासून, ऑस्ट्रेलिया दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन करत आहे. मात्र 1984, 1988 आणि 1994 मध्ये बॉक्सिंग डे टेस्ट होऊ शकली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं ख्रिसमसच्या आधी कसोटी सामन्याचं आयोजन केलं होतं. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका देखील दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट खेळतात.

मेलबर्नमध्ये दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट का खेळवली जाते? : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली बॉक्सिंग डे कसोटी 1950 मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया इथं खेळली गेली. 1892 साली बॉक्सिंग डेच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची देशांतर्गत स्पर्धा शेफिल्ड शील्ड देखील या मैदानावर प्रथमच खेळली गेली. 1980 पासून इथं दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट नियमितपणे खेळली जाते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी (बॉक्सिंग डे टेस्ट) देखील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

हेही वाचा :

  1. 18 वर्षांनंतर विंडीज संघ करणार 'या' देशाचा दौरा; मालिकेसाठी संघाची घोषणा
  2. भारत-पाकिस्तानच नाही तर 'हा' संघ पहिल्यांदाच खेळणार 'बॉक्सिंग डे' कसोटी; एकाच दिवशी सुरु होणार 3 सामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.