महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

घरत कुटुंबीय येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर - Gharat Ganapati - GHARAT GANAPATI

movie Gharat Ganapati : कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेला कौटुंबीक जिव्हाळ्याच्या विषयावरील 'घरत गणपती' या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला थिएटरमध्ये रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

The movie Gharat Ganapati
'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर (PR Agency)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 5:37 PM IST

मुंबई -movie Gharat Ganapati : ‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी 'घरत कुटुंबा'ची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर (PR Agency)

मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ प्रदर्शनासाठी तयार होत आहे. हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे.

'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर (PR Agency)

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे.

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. ही गुंफण प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या बरोबर भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे, तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

हेही वाचा -

भारतीय संघाला प्रोत्साहन देताना अमिताभ बच्चननं 'अश्वत्थामा'च्या रुपात टी 20 वर्ल्ड कप 2024ची केली घोषणा - Amitabh Bachchan

ईशा देओलनं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 44वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - DHARMENDRA HEMA WEDDING ANNIVERSARY

'इंडियन आयडॉल'च्या स्टेजवर गोविंदानं मुलगा यशबरोबर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल - GOVINDA DANCE VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details