महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा - करण सिंग ग्रोव्हर

Valentine Day : 'व्हॅलेंटाईन्स डे' दिनानिमित्त करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने शांतपणे केलेल्या सेलेब्रिशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 30 एप्रिल 2016 रोजी लग्नांच्या बंधनात अडकलेले हे जोडपे एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी जीवन जगत आहे.

Karan Singh Grover, Bipasha Basu
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 11:02 AM IST

मुंबई - Valentine Day : आपल्या जोडीदारावर प्रेमाचा नियमित वर्षाव करणे आणि प्रेमानं काळजी घेणे महत्त्वाचे असले तरी १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन्स डे'चा दिवस इतर दिवसापेक्षा वेगळा आहे. या प्रसंगी जगभरातील प्रेमी त्यांच्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करतात आणि बॉलिवूड सेलिब्रिटी या रोमँटिक खेळासाठी काही नवखे नाहीत. दरवर्षी ते आपल्या प्रेमाची झलक दाखवून आणि मनापासून संदेशलिहून ते आपल्याला प्रभावित करत असतात. यावर्षी बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी 'व्हॅलेंटाईन्स डे' सेलिब्रेशनमधील त्यांचे आनंदी क्षण शेअर केले आहेत.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी शांततेत 'व्हॅलेंटाईन डे' पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांची मुलगी देवी शांतपणे झोपलेली दिसते. या शांत वातावरणात करणने आपल्या प्रेमळ पत्नीला सुंदर पुष्पगुच्छ देऊन खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या आनंदी प्रसंगाची झलक दाखवली. आपल्या प्रिय पतीने दिलेल्या या प्रेमळ भेटीचं बिपाशानं स्वागत केलं. एक सुंदर आणि शांत सेलेब्रिशनबद्दल तिने करणला प्रेमळ शुभेच्छाही दिल्या आहेत.

बिपाशाने त्यांच्या लग्नाच्या मेहंदी समारंभातील आठवणी शेअर करून 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या रोमँटिक वातावरणात भर घातली. फोटोमध्ये, बिपाशा बसू आकर्षक फुलांच्या दागिन्यांसह गुलाबी आणि पिस्त्याच्या फुलांच्या ड्रेसमध्ये चमकदार दिसत होती. याच्या कॅप्शनमध्ये तिनं आपल्या फॉरएव्हर व्हॅलेंटाइनला 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करण ग्रोव्हरनेही इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि त्याच्या प्रिय पत्नीचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने पत्नी बिपाशाबद्दलचे प्रेम व्यक्त केलंय. आपल्यासह सुखी संसार केल्याबद्दल त्याने पत्नीचं आभारही मानले आहेत.

कामाच्या आघाडीवर, करण सिंग ग्रोव्हर अलीकडेच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटात स्क्वाड्रन लीडर सरताज गिलच्या भूमिकेत दिसला होता. यापूर्वी त्याने 'दिल मिल गये' आणि 'कुबूल है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो 'अलोन' आणि 'हेट स्टोरी 3' सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे. दुसरीकडे बिपाशा बसूने 'अजनबी'मधून पदार्पण केले आणि 2002 मध्ये विक्रम भट्टच्या हॉरर चित्रपट 'राझ'मधील भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली.

हेही वाचा -

  1. 'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन आणि विद्या बालनबरोबर दिसणार माधुरी दीक्षित
  2. वरुण तेज स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार
  3. 'बिग बॉस 14' फेम कपल पवित्रा पुनिया आणि एजाज खानचं झालं ब्रेकअप

ABOUT THE AUTHOR

...view details