मुंबई - राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'गेम चेंजर' हा या आठवड्यातील सर्वात चर्चेत असलेला नवीन रिलीज चित्रपट आहे. संक्रांती-पोंगलच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या शंकर दिग्दर्शित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर एंट्री केली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, राम चरण अभिनीत या चित्रपटाचा पहिला दिवस खूप चांगला गेला. पहिल्या दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई करून जगभरात या चित्रपटानं नेत्रदीपक ओपनिंग केली आहे. भारतातही ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय. असं असलं तरी, एवढी मोठी कमाई करूनही, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' आणि ज्युनियर एनटीआरचा 'देवरा: पार्ट १' चित्रपटाचा विक्रम मोडू शकलेला नाही.
Box Office: #GameChanger Opening Day Early Estimateshttps://t.co/JBCrOQ2LIj
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) January 10, 2025
'गेम चेंजर'चा बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, 'गेम चेंजर'नं पहिल्या दिवशी भारतात ५१.२५ कोटी रुपये कमावले आहेत. या रिपोर्टनुसार, राम चरण अभिनीत या चित्रपटानं तेलुगू भाषिक आंध्र आणि तेलंगणा राज्याचा पट्ट्यात सर्वाधिक कमाई केली. तेलुगूमध्ये या चित्रपटानं ४२ कोटी रुपये कमावले, तर तमिळमध्ये २.१ कोटी रुपये कमावले आहेत. शंकरच्या चित्रपटानं हिंदीमध्ये ७ कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. तर मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुक्रमे ५ लाख आणि १ लाख रुपये कमावले आहेत.
'गेम चेंजर' चित्रपटाच्या तेलुगू भाषेतील आवृत्तीला भारतभर ३८६३ शो मिळाले. तमिळमध्ये अंदाजे ६५० आणि हिंदीमध्ये २४८५ शो होते. हा चित्रपट निवडक चित्रपटगृहांमध्ये 2D आणि IMAX 2D मध्ये प्रदर्शित झाला आहे.
BREAKING: Game Changer takes ₹1️⃣0️⃣0️⃣ cr+ opening at the WW Box Office.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 10, 2025
Actuals in the morning.
'गेम चेंजर' दिवस पहिला जागतिक कलेक्शन
चित्रपट उद्योगाचे ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी राम चरणच्या नवीन चित्रपटाचा जगभरातील कलेक्शन रिपोर्ट शेअर केला आहे. त्याच्या ऑफिशियलएक्सवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, 'गेम चेंजरनं जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हे सकाळचे आकडे आहेत.
'गेम चेंजर' 'पुष्पा २' आणि 'देवरा' पेक्षा पिछाडीवर
'गेम चेंजर' नं जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त कमाईचा विक्रमी केला असला तरी, अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट 'पुष्पा २' आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट 'देवरा' यांचे रेकॉर्ड तो मोडू शकलेला नाही. 'पुष्पा २' च्या निर्मात्यांच्या मते, चित्रपटाने जगभरात २९४ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर भारतात १७५ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, 'देवरा'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर १७२ कोटी रुपयांची कमाई केली. याआधी या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ७७ कोटी रुपये कमावले होते.
MAN OF MASSES @Tarak9999 shakes the world with 𝟏𝟕𝟐 𝐂𝐫𝐨𝐫𝐞𝐬+ 𝐆𝐁𝐎𝐂 𝐨𝐧 𝐃𝐚𝐲 𝟏 💥💥#Devara #BlockbusterDevara#KoratalaSiva #SaifAliKhan #JanhviKapoor @anirudhofficial@NANDAMURIKALYAN @RathnaveluDop @sabucyril @sreekar_prasad @Yugandhart_ @YuvasudhaArts… pic.twitter.com/6VhwFdgIw9
— Ramesh Bala (@rameshlaus) September 28, 2024
'गेम चेंजर' बद्दल
'गेम चेंजर' हा एक पोलिटिकल ड्रामा थ्रिलर आहे जो राम नंदन (राम चरण) नावाच्या आयएएस अधिकाऱ्याच्या पात्राभोवती फिरतो. या चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे, शंकर यांनी या कमर्शिएल मनोरंजक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १० जानेवारी रोजी थिएटरमध्ये येणारा 'गेम चेंजर' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.