ETV Bharat / entertainment

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती ठीक असल्याचा जवळच्या व्यक्तीकडून दावा - TIKU TALSANIA SUFFERS HEART ATTACK

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत गेली 40 वर्षे सक्रिय असलेले अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात न्ण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येतीला धोका नसल्याचं समजतंय.

Tiku Talsania
टिकू तलसानिया ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 11, 2025, 1:51 PM IST

Updated : Jan 11, 2025, 3:28 PM IST

मुंबई - बॉलिवूड आणि गुजराती चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता टिकू तलसानिया यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. मोठा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. काही माध्यमांनी तर त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचंही म्हटलंय. परंतु, त्यांची तब्येत बरी असल्याचं जवळच्या व्यक्तीकडून समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय टिकू तलसानिया यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासात आढळून आलं की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येतंय.

टिकू तलसानिया हे चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांनी 'देवदास', 'जोडी नंबर १', 'शक्तीमान', 'कुली नंबर १', 'राजा हिंदुस्तानी', 'दरार', 'जुडवा', 'प्यार किया तो डरना क्या', 'राजू चाचा', 'मेला', 'अखियों से गोली मारे', 'हंगामा', 'ढोल', 'धमाल', 'स्पेशल 26' 'सर्कस', 'हंगामा २' अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

वयाच्या ७० व्या वर्षीही टिकू तलसानिया चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी अभिनीत 'विकी विद्या का वो वाला' चित्रपटाच्या व्हिडिओमध्ये ते अखेरचं दिसले होते.

टिकू तलसानिया यांची मुलगी शिखा तलसानिया ही देखील एक अभिनेत्री आहे. ती 'वीरे दी वेडिंग', 'कुली नंबर १' आणि 'आय हेट लव्ह स्टोरीज' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. टिकू तलसानिया यांचा मुलगा रोहन तलसानिया हा देखील एक संगीतकार आहे.

टिकू तलसानियाने १९८४ मध्ये डीडी नॅशनलच्या टीव्ही शो 'ये जो है जिंदगी' मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर, त्यांनी १९८६ मध्ये 'प्यार के दो बोल' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. गेल्या ४० वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.

Last Updated : Jan 11, 2025, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.