सातारा : खंडोबाच्या नावानं चांगभलं, यळकोट..यळकोट जय मल्हारचा गजर आणि भंडाऱ्याच्या उधळणीत खंडोबा-म्हाळसा यांचा (Khandoba and Mhalsa Wedding Ceremony) शाही विवाह सोहळा शनिवारी गोरज मुहूर्तावर संपन्न (Pali Khandoba Yatra) झाला. यात्रेला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील सुमारे पाच लाखांवर भाविक उपस्थित होते.
गोरज मुहूर्तावर शाही विवाह संपन्न : खंडोबा-म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा शनिवारी गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. यावेळी लाखो भविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट.. येळकोट.. जय मल्हारचा गजर केला. भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत पाल नगरी (Pali Khandoba Yatra) न्हाऊन निघाली. खंडोबा देवाच्या यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस असल्यानं लाखो भाविक पाल नगरीत दाखल झाले होते.
मिरवणुकीत भंडारा, खोबऱ्याची उधळण : वाळवंटात बांधलेल्या पुलावरील मुख्य मिरवणूक मार्गावरुन रथ आल्यानंतर लाखो भाविकांनी रथावर भंडारा, खोबऱ्याची उधळण केली. मंदिरासमोरील काशिळ-तारळे पूल, तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भाविकांनी खचाखच भरली होती. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं यात्रेचा मुख्य दिवस निर्विघ्न पार पडला.
मांढरदेव यात्रेला रविवारपासून सुरूवात : वाई तालुक्यातील मांढरदेवी (काळूबाई देवी) यात्रा रविवारपासून (१२ जानेवारी) सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोंबड्या, बकऱ्यांची वाहतूक आणि हत्या, झाडाला खिळे ठोकणे, लिंबू, बाहुल्या अडकविण्यावर बंदी आहे. अशा प्रकारांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर राहणार आहे. भेसळयुक्त पदार्थांची विक्री टाळण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाची भरारी पथके नेमण्यात आली आहेत. १२ ते १४ जानेवारीपर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. तसेच भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
हेही वाचा -