मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साईचरणी; म्हणाले 'समाजातील दुफळी लवकर दूर करण्यासाठी सरकार करणार प्रयत्न' - DEVENDRA FADNAVIS IN SHIRDI
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-01-2025/640-480-23306001-thumbnail-16x9-shirdi.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 11, 2025, 10:43 PM IST
शिर्डी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिर्डीत येऊन साई बाबांचं दर्शन (Sai Darshan) घेतलं. यावेळ त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील तणाव आपल्या सर्वांना मिळूनच शांत करावा लागणार आहे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी पाहायला मिळत आहे. तसेच परभणीतही आंदोलना सुरू असल्याचं आहे. हे दोन्ही भाग शांत झाले पाहिजे तसेच जी दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी सरकार कटीबद्ध आहे", तसेच महाविजय अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीची दिशा देखील ठरणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीनं शॉल, साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय.