महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालचं लग्न, व्हिडिओ व्हायरल - sonakshi sinha wedding - SONAKSHI SINHA WEDDING

Sonakshi Zaheer special video : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालबरोबर आज लग्नबेडीत अडकणार आहे. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Sonakshi Zaheer special video
सोनाक्षी आणि झहीरचे स्पेशल व्हिडिओ (सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 6:18 PM IST

मुंबई - Sonakshi Zaheer special video :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बालबरोबर 23 जून रोजी म्हणजेच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नापूर्वी सोनाक्षीच्या कुटुंबीयांनी पूजा समारंभ आयोजन केलं होतं. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच, एक न पाहिलेला फोटो समोर आला होता. यात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा त्यांच्या कुटुंबासह घरी 'रामायण' येथे पूजा समारंभ साजरा करताना दिसले. आता लग्नाबद्दल दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याचा विवाह नोंदणीकृत मुंबईतच होईल. यानंतर हे कपल ग्रॅण्ड रिसेप्शनही देणार आहे.

शत्रुघ्न सिन्हाचं लग्न :शत्रुघ्न सिन्हाचा जवळचा मित्र अनु रंजननं इंस्टाग्राम स्टोरीवर प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत संपूर्ण सिन्हा कुटुंब दिसत आहे. फोटोसाठी प्रत्येकजण हसत हसत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दरम्यान सोनाक्षी सिन्हा घरातून निघून लग्नस्थळी पोहोचली आहे. याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. सोनाक्षी सिन्हानंतर तिची आई पूनम सिन्हाचेही काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात ती कारमध्ये बसून लग्नस्थळाकडे निघताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पूनम सिन्हा हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होती. याशिवाय तिनं कपाळावर मोठी बिंदीही लावली होती.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे व्हिडिओ व्हायरल :तसेच झहीर इक्बालही त्याच्या घरातून लग्नासाठी रवाना झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो कॅज्युअल लूकमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात हुमा कुरेशी, साकिब सलीम, आयुष शर्मा, 'हिरामंडी' कलाकारांसह अनेक सेलिब्रिटी हजर असू शकतात. दरम्यान सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं ती 'हाऊसफुल्ल 5' आणि 'निकिता रॉय और द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले'मध्ये कमल हासननं केलं टेक्नीशियनचं काम - amitabh bachchan
  2. तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया - nana patekar
  3. शाहरुख खाननं सामंथा रुथ प्रभूबरोबर साईन केला आगामी चित्रपट - shah rukh khan signs next film

ABOUT THE AUTHOR

...view details