महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणवीर अलाहाबादियाच्या वादानंतर, बी प्राकनं बीअर बायसेप्स पॉडकास्टमध्ये जाणं टाळलं, दिलं 'हे' कारण... - RANVEER ALLAHBADIA

रणवीर अलाहाबादियाच्या अयोग्य टिप्पणीनंतर गायक बी प्राकनं बीअर बायसेप्स पॉडकास्टमधून आपले नाव मागे घेतले आहे.

B Praak
बी प्राक (बी प्राक-रणवीर अलाहाबादिया (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 11, 2025, 2:17 PM IST

मुंबई : लोकप्रिय गायक आणि संगीतकार बी प्राकनं युट्यूबर-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर बीअर बायसेप्स पॉडकास्टमधून त्याचं नाव मागे घेतलं आहे. रणवीर अलाहाबादियानं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोदरम्यान पालकांवर अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर, बी प्राकनं रणवीरच्या पॉडकास्टचा भाग न होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यानं सोशल मीडियाची मदत घेतली आहे. गेल्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी बी प्राकनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यानं आपली नाराजगी व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये बी प्राक रणवीर अलाहाबादियाच्या विधानावर टीका करत आहे.

बी प्राकनं बीअर बायसेप्स पॉडकास्टवर जाणंचकेलं रद्द :या व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलं, "राधे-राधे मित्रांनो.' तुम्ही सगळे कसे आहात? मी बीअर बायसेप्स पॉडकास्टवर जाणार होतो, पण आम्ही मी ते रद्द केलंय. कारण समय रैनाच्या शोमध्ये कोणत्या प्रकारचे वाईट विचार आणि शब्द वापरले जातात? जे घडत आहे ते आपली भारतीय संस्कृती नाही." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "तुम्ही तुमच्या पालकांबद्दल कोणती गोष्ट सांगत आहात?' तुम्ही त्यांच्याशी काय बोलत आहात? तुम्ही कोणत्या पद्धतीनं बोलत आहात? हे विनोदी आहे का? हे अजिबात विनोदी नाही. ही अजिबात स्टँड-अप कॉमेडी नाही. लोकांना शिवीगाळ करणे, लोकांना शिवीगाळ देणे शिकवणे, ही कोणती पिढी आहे? मला समजत नाही."

बी प्राकनं रणवीर अलाहाबादियावर साधला निशाना : बी प्राकनं रणवीर अलाहाबादियावरही निशाणा साधत म्हटलं, "तुम्ही (रणवीर अलाहाबादिया) सनातन धर्माचा प्रचार करता, अध्यात्माबद्दल बोलता. तुमच्या पॉडकास्टवर इतके मोठे लोक, इतके महान संत येतात आणि तरीही तुमचे विचार इतके वाईट आहेत? मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेन की जर आपण हे थांबवू शकलो नाही, तर तुमच्या मुलांचे भविष्य खूप वाईट होणार आहे. आता खूप वाईट घडणार आहे. कृपया, मी समय रैना आणि त्या शोमध्ये येणाऱ्या सर्व विनोदी कलाकारांना हात जोडून विनंती करतो की, कृपया असे करू नका. आपली भारतीय संस्कृती जपा आणि लोकांना या गोष्टी न करण्यास प्रवृत्त करा, माझी ही विनंती आहे."

रणवीर अलाहाबादियाचा खटला :रणवीर अलीकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा यांच्याबरोबर जज म्हणून दिसला होता. शोच्या दरम्यान, त्यानं एका स्पर्धकाला त्याच्या पालकांबद्दल एक अश्लील प्रश्न विचारला होता. यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्स आणि सेलिब्रिटींनी हा प्रश्न अयोग्य असल्याचं म्हटलं. तसेच त्याला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं. पालकांवर अश्लील विधान केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. आसाममध्ये रणवीर अलाहाबादियाविरुद्ध तक्रार दाखल, राष्ट्रीय महिला आयोगानं त्वरित कारवाईची केली मागणी...
  2. रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीसांची धडाकेबाज कारवाई
  3. 'मला माफ करा' म्हणत रणवीर अलाहाबादियानं पोस्ट केला व्हिडिओ, कारवाईच्या भीतीनं झाली उपरती

ABOUT THE AUTHOR

...view details