ETV Bharat / entertainment

विजय देवेराकोंडाच्या सिनेमात रणबीर कपूर आणि सूर्याची एन्ट्री, टिझरमधून मिळणार सरप्राईज - VIJAY DEVERAKONDA VD12 FILM

विजय देवरकोंडाच्या आगामी 'व्हीडी१२' या चित्रपटाचा टीझर १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि सूर्याचीही एन्ट्री झाली आहे.

Ranbir Kapoor and Surya's entry in VD12
विजय देवेराकोंडाच्या सिनेमात रणबीर कपूर आणि सूर्याची एन्ट्री ((ANI/IANS/FILM POSTER))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 11, 2025, 6:30 PM IST

मुंबई - साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित 'व्हीडी१२' ( VD12 ) या चित्रपटाची चर्चा आता वाढली आहे. आता याच्या शीर्षकासह रिलीज तारीख टिझरमधून जाहीर केली जाणार आहे. शीर्षक आणि टीझर १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे आणि रिलीजच्या एक दिवस आधी, निर्मात्यांनी चाहत्यांसाठी आणखी एक रोमांचक अपडेट दिली आहे. हा टीझर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रमुख कलाकार आपला आवाज देतील. त्यामुळे हा एक स्टार स्टडेड इव्हेन्ट ठरणार आहे.

हिंदी व्हर्जनमध्ये रणबीर कपूर आवाज देणार - विजय देवरकोंडाच्या चाहत्यांचा उत्साह इथंच संपत नाही कारण रणबीर कपूर हा देखणा बॉलिवूड कलाकार टीझरच्या हिंदी आवृत्तीलाही आपला आवाज देणार आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये, अ‍ॅनिमलमधील रणबीर कपूरचा अद्भुत लूक शेअर करत, सितारा एंटरटेनमेंटने लिहिलंय की, 'एक कथा जी पाहण्यासारखी होती... आता ती आणखी रोमांचक बनली आहे.' आगामी 'व्हीडी१२' चित्रपटाच्या टीझरला रणबीर कपूरनं आवाज दिला आहे. १२ फेब्रुवारी हा दिवस सर्वांसाठी एक मेजवानी असणार आहे.

तमिळ चित्रपटासाठी सुर्या आवाज देणार - विजय देवराकोंडाच्या आगामी 'व्हीडी१२' चा टीझर तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होईल. गुरुवारी, निर्मात्यांनी घोषणा केली की तमिळ व्हर्जनमधील चित्रपटाला सुपरस्टार सूर्या आवाज देईल तर हिंदी आवृत्तीला रणबीर कपूर आवाज देईल. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये टीझरबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रॉडक्शन बॅनर सितारा एंटरटेनमेंट्सनं एक्स ( X ) सोशल मीडिया हँडल वर लिहिलं की, "एका राजाची कहाणी... ज्यामध्ये तो सिंहासन मिळविण्यासाठी आपले नशीब आजमावणार आहे. यात आणखी एक मनोरंजक भर म्हणजे, सुप्रीमो सूर्यानं 'व्हीडी१२' तमिळ टीझरला आपला आवाज दिला आहे. १२ फेब्रुवारीसाठी सज्ज व्हा."

रणबीर कपूर आणि सुर्या बरोबरच आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआर देखील 'व्हीडी१२' मध्ये आपला आवाज देणार आहे. सितारा एंटरटेनमेंटनं अलीकडेच इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे खुलासा केला की ज्युनियर एनटीआर देखील या टीझरला आपला आवाज देणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, विजय पहिल्यांदाच 'व्हीडी१२' मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याच्या लूक पोस्टरमध्ये तो अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. यावरून दिसतंय की चित्रपटात काही अद्भुत अ‍ॅक्शन असणार आहे. विजयबरोबर भाग्यश्री बोसरे मुख्य भूमिकेत आहे, तर सत्यदेव नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.