महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मन्नतच्या बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांना दिसला ईदचा चाँद, पाहा व्हिडिओ - Shahrukh Khan Eid - SHAHRUKH KHAN EID

Shahrukh Khan Eid शाहरुख खानने 'पठाण' लूकमध्ये मन्नत बंगल्याच्या बाहेर येऊन तमाम फॅन्सना ईदच्या निमित्तानं अभिवादन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.

Shahrukh Khan Eid
शाहरुख खान ईद

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 1:15 PM IST

मुंबई - Shahrukh Khan Eid शाहरुख खाननं गुरुवारी 11 एप्रिल रोजी संध्याकाळी त्याच्या मन्नत बंगल्यातून बाहेर पडून ईदच्या शुभेच्छा दिल्या. तो आपल्या धाकट्या मुलासह चाहत्यांच्या भेटीसाठी आला होता. चाहत्यांना भेटल्यानंतर त्याच्या मॅनेजरने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे.

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या बाहेर त्याच्या फॅन्सचा जनसागर जमला होता. लोकांची वाढत चाललेली गर्दी पाहून पोलिसांनी घराभोवती बॅरिकेड्स उभा केले होते. सर्वांच्या नजरा मन्नत बंगल्याच्या बाहेर बाल्कनीत असलेल्या त्या खास जागेकडे रोखल्या होत्या. याच जागी उभे राहून शाहरुख आपल्या फॅन्सना अभिवादन करत असतो. 11 तारखेच्या संध्याकाळी ईदचा चाँद दिसावा तसाच शाहरुख मन्नतच्या बाहेर उभे असलेल्या त्याच्या तमाम चाहत्यांना दिसला.

गुरुवारी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने तिच्या इंस्टाग्रामवर किंग खानचा हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये किंग खान पांढऱ्या रंगाच्या पठाणी कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्याने आपले मोठे केस मागच्या बाजूला बांधले आहेत. हा फोटो शेअर करताना तिनं मून इमोजीसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'ईद मुबारक, आनंद, प्रेम आणि प्रकाश'.

त्याचवेळी, ईदच्या निमित्ताने किंग खानने चाहत्यांसोबत एका खास भेटीची झलक त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वांना ईदच्या शुभेच्छा. माझा दिवस इतका खास बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अल्लाह आपल्या सर्वांना प्रेम, आनंद आणि समृद्धी देवो.'

फॅन्सना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना अदाब आणि अभिवादन करण्यासाठी शाहरुख खान त्याचा मुलगा अबराम बरोबर मन्नतमधून बाहेर पडला. यावेळी त्यानं मॅचिंग पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. या पिता-पुत्राच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. बाहेर जमलेल्या तमाम चाहत्यांच्या गर्दीला त्यांनी हात दाखवत अभिवादन केलं. यादरम्यान किंग खानही सिग्नेचर पोज देताना दिसला.

हेही वाचा -

  1. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid
  2. ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 'फुले'च्या टीमनं नवीन मोशन पोस्टर केलं प्रदर्शित - Phule New Poster
  3. एआर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर'साठी सलमान खाननं 2025 ईदची रिलीज डेट केली लॉक - Salman Khan and Sikandar Movie

ABOUT THE AUTHOR

...view details