मुंबई - Shahid Kapoor Reveals His Date for Tonight : हिंदी मनोरजंन जगतातील लोकप्रिय स्टार शाहिद कपूर त्याची लाडकी पत्नी मीरा राजपूतचे कौतुक करण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाही. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी,बहुतेक लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर एन्जॉय करत असताना 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चा अभिनेता शाहिद स्वतःला त्याच्या पत्नीपासून दूर असल्याचे दिसते. एका मजेशीर ट्विस्टमध्ये, शाहिदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर या दिवसात तो करत असलेल्या डेटाचा खुलासा केलाय.
''आय लव्ह यू मीरा, तू प्रवास करत असल्यामुळे तू शहरात नाहीस. हीच माझी नाईट डेट आहे.'' यामध्ये चेहऱ्यावर खेळकर हास्य ठेवत त्यानं खरी डेट उलगडली आहे. 7 जुलै 2015 रोजी मीरासोबत लग्न करणाऱ्या शाहिदला मीशा नावाची मुलगी आणि झैन नावाचा मुलगा अशी दोन मुले आहेत.
अलिकडेच मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, शाहिदने त्याच्या आयुष्यातील एका निर्णायक क्षणाबद्दल सांगितले, जिथे त्याने राधा सोमी संस्थेचा उल्लेख केला. त्यानं सांगितलं की संस्था हा त्यांचा निवडलेला अध्यात्मिक मार्ग बनला आहे, कारण त्यांच्याकडे जीवन, त्याची उत्पत्ती आणि उद्दिष्टे याविषयी नेहमीच खोल कुतूहल असते आणि उत्तरे न मिळाल्याने त्यांना अनेकदा हरवल्यासारखे वाटते.