मुंबई - Shahid Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता शाहिद कपूर सध्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या यशाचा आनंद लुटत आहे. गेल्या सोमवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी तो पत्नी मीरा कपूरबरोबर रोमँटिक डिनर डेटवर गेला होता. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी या जोडप्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. शाहिद जेव्हा मीराबरोबर रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला पापाराझीनं घेरलं, यावर तो नाराज झाला. आता पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर शाहिद कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संतप्त झालेल्या शाहिद असे म्हणताना ऐकू येते, "मित्रांनो, तुम्ही हे सर्व थांबवू शकता का? "
शाहिद आणि मीरा राजपूत कपूरचा व्हिडिओ व्हायरल :आता शाहिद कपूरच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "शाहिदची पत्नी स्वत:ला स्टार समजते." दुसऱ्या एकानं लिहिलं, "कपूर कुटुंबातील बेस्ट कपल." आणखी एकानं लिहिलं, "शाहिद हा आता खूप वेगळा दिसत आहे." याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये शाहिदनं काळ्या रंगाची टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. याशिवाय मीरानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना हे जोडपे हात धरलेले दिसत आहे. शाहिद आणि मीरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.अनेकदा हे जोडपे आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.