मुंबई : बॉलिवूडचे क्यूट एक्स कपल शाहिद कपूर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकाच छताखाली स्पॉट झाले आहेत. धीरूभाई अंबानीच्या वार्षिक समारंभात त्यांच्या मुलांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी शाहिद आणि करीना सहभागी झाले होते. यावेळी करीना पती सैफ अली खानबरोबर मुलगा तैमूरचा परफॉर्मन्सचा आनंद लुटताना दिसली. याशिवाय शाहिद कपूर देखील पत्नी मीरा राजपूतबरोबर दिसला. या फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हि़डिओत शाहिद कपूर त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरच्या मागे बसलेला दिसत आहे. आता या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकजण लाईक करत आहेत.
शाहिद कपूर आणि करीना कपूर एकत्र :व्हिडिओत करीना कपूर खाननं लाल आणि काळ्या रंगाच्या रंगसंगतीचा ड्रेस परिधान केला आहे. याशिवाय सैफ अली खाननं सूट परिधान केला आहे. करीना आणि सैफबरोबर बसून तैमूरच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ मोबाईलमध्ये घेताना दिसत आहे. तसेच मागच्या रांगेत शाहिद कपूर हा स्टाईलिश अंदाजात दिसत आहे. शाहिद हा अगदी करीनाच्या मागे बसल्याचा व्हिडिओत दिसत आहे. आता अनेक यूजर्स यांच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्स देत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, ' मी हे पाहण्यास अजिबात तयार नव्हतो, पण हे घडले.' दुसऱ्या एकानं लिहिलं,' दोघांची जोडी चांगली होती, पण वेळेनं काहीतरी वेगळंच केलं.' शाहिद आणि करीनाचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत.