मुंबई - Ghudchadi First Look Out : अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन हे 90 च्या दशकातील हिट जोडींपैकी एक होते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. बिनॉय गांधी दिग्दर्शित 'घुडचडी' या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दोघेही दिसणार आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी चाहत्यांसाठी चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च केला आहे. आता या चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचं दिसत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत संजय दत्त आणि रवीना टंडनची जोडी सुंदर असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर 'घुडचडी'चा फर्स्ट लुक रिलीज, 'या' दिवशी होईल प्रीमियर - Ghudchadi First Look Out - GHUDCHADI FIRST LOOK OUT
Ghudchadi First Look Out : संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर 'घुडचडी'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना रोमँटिक-कॉमेडी पाहायला मिळणार आहे.

Published : Jul 23, 2024, 2:14 PM IST
'घुडचडी'चा फर्स्ट लूक केला शेअर : फर्स्ट लूक पोस्टवर निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "डबल लव्ह-डबल कन्फ्युजन, 9 ऑगस्टपासून जिओ सिनेमावर 'घुडचडी'चा प्रीमियर होणार आहे." पोस्टरमध्ये संजय दत्त आणि रवीना टंडन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहेत. तसेच या पोस्टरमध्ये खुशाली कुमार आणि पार्थ समथान देखील रोमँटिक पोझमध्ये असल्याचं दिसत आहे. निर्मात्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. चित्रपटाच्या सेटवरून क्रू आणि कलाकारांची एक झलकही समोर त्यावेळी आली होती. या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर, रवीना टंडननं स्टुडिओ मधून डबिंग करतानाचे फोटो शेअर केले होते.
पार्थ समथानबद्दल :संजय दत्त आणि रवीना टंडनबरोबर या चित्रपटात गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार आणि टीव्ही अभिनेता पार्थ समथानबरोबर दिसणार आहे. याशिवाय अरुणा इराणी कोहली 'घुडचडी' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असेल. टीव्ही अभिनेता पार्थ समथान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याआधी हा तो काही वेब सीरीजमध्ये दिसला आहे. त्यानं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय. यामध्ये 'ये है आशिकी', 'कैसी यह यारीआं', 'कसौटी जिंदगी की' आणि 'प्यार तूने क्या किया' आहेत. याशिवाय त्यानं वेब सीरीज 'मैं हीरो बोल रहा हूं' आणि 'सोशल करन्सी' यामध्ये काम केलं आहे. यामधील त्याचा अभिनय अनेकांना आवडला आहे.