मुंबई : दुबई येथे क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात 'चॅम्पियन ट्रॉफी' स्पर्धा सुरू आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानसोबत हाय व्होल्टेज सामना झाला. या हाय व्होल्टेज सामन्याकडं जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं होतं. भारत जिंकणार की पाकिस्तान याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर धावांचा पाठलाग करताना भारताचे चार गडी बाद झाले. मात्र, मॅचच्या अखेरीस भारतानं पाकिस्तानवर सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर देशभरात दिवाळी साजरी करण्यात येत असल्याचं बघायला मिळतंय. तसंच मुंबईतही ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
देशात दिवाळी साजरी : भारत पाकिस्तानचा सामना नेहमीच हाय व्होल्टेज असतो. या सामन्याकडं जसं भारत-पाकिस्तानचं लक्ष असतं. तसंच जगभरातील क्रिकेटप्रेमींचंही लक्ष असतं. दरम्यान, पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत भारताला माफक आव्हान दिलं. भारतानं चार गडी गमावून हा सामना सहज जिंकला. पाकिस्तानवर सहा गडी राखून भारतानं दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर देशभरात आनंद साजरा होत आहे. क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडून, मिरवणूक काढून, ढोल वाजवून या विजयाचा जल्लोष साजरा केला
विराट कोहलीचं शानदार शतक : सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 240 धावांचं माफक आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली. विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. त्याला साजेशी साथ श्रेयश अय्यरनं अर्धशतकी खेळी करत दिली. विराटनं वैयक्तिक 51 शतक नोंदवले. भारताला विजयासाठीही तेवढ्याच धावा हव्या होत्या आणि विराटच्या शतकासाठीही तेवढ्याच धावा असताना, अक्षर पटेलनं विराटला स्ट्राइक दिला. विराटनं विजयासाठी तीन धावांची गरज असताना चौकार ठोकत दणदणीत विजय मिळवला.
हेही वाचा -