ETV Bharat / entertainment

सोनाली बेंद्रेनं पतीसह लावली महाकुंभमेळ्यात हजेरी, फोटो व्हायरल... - SONALI BENDRE VISIT THE MAHA KUMBH

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही महाकुंभमेळ्यात गेली आहे. तिनं पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केलंय. आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sonali Bendre
सोनाली बेंद्रे (Bollywood actor Sonali Bendre (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 23, 2025, 2:41 PM IST

मुंबई - महाकुंभमेळ्यादरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केलंय. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या धार्मिक यात्रेची झलक शेअर केली आहे. सोनाली बेंद्रेनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छोटे क्षण, मोठ्या आठवणी.' महाकुंभमेळ्यात तिचे पती गोल्डी बहलही हे देखील तिच्याबरोबर होते. 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपणार आहे. महाकुंभमेळ्यात लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये मनोरंजन जगतातील अनेक मोठ्या स्टार्सनी सहभाग घेतला होता.

सोनाली बेंद्रेनं पवित्र त्रिवेणी संगमात केलं स्नान : सोनाली बेंद्रेचे महाकुंभमेळ्या स्नान करत असतानाचे फोटो अनेकांना आवडत आहेत. तिचे चाहते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल झालेल्या पहिल्या फोटोत सोनाली आपल्या पतीबरोबर असल्याची दिसत आहे. फोटोत हे जोडपे कॅज्युअल लूकमध्ये आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये गंगा नदीवरील घाट दाखविण्यात आलं आहे. तिसऱ्या फोटो सोनाली ही गंगा नदीच्या आत पूजा करताना दिसत आहे. तसेच आणखी एका फोटोमध्ये सोनाली टेलीस्कोपमधून प्रयागमधील दृश्य पाहताना दिसत आहे. सोनालीनं शेअर केलेली ही फोटो खूप आकर्षक आहे. तसेच संगममध्ये स्नान केल्यानंतर, सोनालीनं आरती देखील केली. सोनालीनं कुटुंबासह इतर धार्मिक विधींमध्ये भाग घेतला.

सोनाली बेंद्रेबद्दल : दरम्यान अडीच दशके बॉलिवूडमध्ये अभिनय करून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील एका प्रसिद्धी असून सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून ती रुपेरी पडद्यावर झळकली नाही. दरम्यान सोनालीला 2018 मध्ये हाय-ग्रेड कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. आता ती या बीमारीतून बरी झाली आहे. तसेच तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी अक्षय खन्नाबरोबर 'लव्ह यू ऑलवेज' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 21 वर्षांहून अधिक काळासाठी अडकला होता. अखेर 7 जुलै 2022 रोजी हा चित्रपट युटुबवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा :

  1. 'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान दिल्यानं नोरा फतेही चर्चेत, सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगावकरनं दिली प्रतिक्रिया - Nora Fatehi Sonali Bendre
  2. सोनाली बेंद्रेनं हरिद्वारमध्ये कुटुंबासोबत नवीन वर्ष केले साजरे
  3. प्रेग्नेंसीतही नकळत करत होती आयटम साँग, सोनाली बेंद्रेचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.