मुंबई : गृहिणीच्या संघर्षावर आधारित सान्या मल्होत्रा स्टारर 'मिसेस' चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात सान्यानं एका मध्यमवर्गीय पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप कौतुक मिळत आहे. मात्र काही लोक या चित्रपटाच्या संदेशाशी सहमत नाहीत. आता यात कंगनाचे नावही जोडलं गेलं आहे. अलीकडेच, सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशननं 'मिसेस'मध्ये दाखवलेल्या स्त्रीवादी दृष्टिकोनावर टीका केली होती.आता कंगनानेही चित्रपटाच्या आशयावर टीका केली आहे. कंगना राणौतनं 'मिसेस'बद्दल थेट काहीही म्हटलं नाही, मात्र तिनं एक पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
कंगनानं केली 'मिसेस'वर टीका : या पोस्टवरून असं दिसत आहे की, कंगनानं सान्याच्या 'मिसेस'बद्दल लिहिलंय. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'मोठी झाल्यावरही, मी कधीही अशी महिला पाहिली नाही, जी तिच्या घरातील लोकांना हुकूम देत नाही, कधी जेवायचे, कधी झोपायचे, कधी बाहेर जायचे, पतीकडून खर्च केलेल्या प्रत्येक पैसाचा हिशोब मागणे, अशा अनेक म्हटलेल्या गोष्टी प्रत्येकाला ऐकावं लागते. जर मला स्वतःबद्दल बोललायचं झाल तर, जेव्हा जेव्हा माझे वडील आमच्यासोबत बाहेर जेवायला जायचे, तेव्हा माझी आई आम्हा सर्वांना फटकारायची कारण आमच्यासाठी स्वयंपाक करणे हा तिचा छंद होता, अशा प्रकारे ती अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत होती. लग्न हे कधीही ओझे राहिले नाही, तर एकमेकांना आधार देण्याचे साधन राहिले आहे.'
कंगना राणौतची पोस्ट चर्चेत : कंगनानं पुढं लिहिलं, 'आमच्या पालकांनी कुठलीही तक्रार न करता त्याच्या आई वडिलांची काळजी घेतली आणि आम्हाला वाढवले. बॉलिवूडनं लग्नाची कल्पना थोडी खराब केली आहे. या देशात लग्न जशी होत आली आहेत, तशीच व्हायला हवीत. लग्नाचा हेतू नेहमीच धर्म राहिला आहे, म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडा आणि पुढे चला. आयुष्य खूप लहान आणि वेगवान आहे, जर तुम्ही जास्त अटेंशन घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या थेरपिस्टबरोबर एकटे सोडले जाईल. आपल्या धर्मग्रंथांमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की, तुम्हाला यश, लग्न प्रसिद्धी आणि लोकांकडून आनंद मिळेल. तुम्हाला फक्त देवाबरोबर आनंद मिळू शकतो. संयुक्त कुटुंब ही आपली सर्वात मोठी ताकद आहे, लग्नाबद्दल चुकीचा संदेश देऊन लोकांना दिशाभूल करणे योग्य नाही. बॉलिवूडने असे संदेश देऊ नयेत.'
'मिसेस' चित्रपटाबद्दल : सान्या मल्होत्राचा 'मिसेस' हा चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. आरती कडव दिग्दर्शित हा चित्रपट सान्या मल्होत्राच्या रिचा या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, जी एक नृत्यांगना आहे आणि तिचे लग्न अशा घरात झाले आहे जिथे पुरुषांचे वर्चस्व आहे. या चित्रपटात रिचाला दररोज लहान-मोठ्या संघर्षांना सामोरे जावे लागते. सध्या या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'मिसेस'मध्ये निशांत दहिया आणि कंवलजीत सिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
हेही वाचा :