ETV Bharat / entertainment

अंकुश चौधरीच्या सर्वोत्कृष्ट 5 चित्रपटांची यादी, पाहा येथे.... - ANKUSH CHAUDHARI TOP 5 MOVIES

मराठी अभिनेता अंकुश चौधरीचे काही विशेष पाच चित्रपट आहेत, जे तुम्ही नक्की पाहायला पाहिजे. आज आम्ही तुमच्यासाठी एक यादी तयार केली आहे.

Ankush chaudhari
अंकुश चौधरी (Ankush chaudhari photo - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 23, 2025, 5:38 PM IST

मुंबई - अंकुश चौधरी हा लोकप्रिय मराठी अभिनेत्यापैकी एक आहे. आजपर्यंत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अंकुश चौधरीनं आपल्या करिअरची सुरुवात 1995मध्ये केली. अंकुशनं आपल्या जबरदस्त अभिनयानं मराठी सिनेसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आज आम्ही अंकुश चौधरीच्या काही लोकप्रिय पाच चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हे चित्रपट पाहूण तुम्ही खूप स्वत:चे मनोरंजन करू शकता.

1 दुनियादारी : अंकुश चौधरी सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कोठारे, रिचा परियाल स्टारर 'दुनियादारी' हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामधील 'टीक टीक वाजते डोक्यात' हे गाणं देखील खूप लोकप्रिय झालं होतं. 'दुनियादारी' चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं. हा चित्रपट 2.5 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 32 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 19 जुलै 2013मध्ये प्रदर्शित झाला होता.

2 सावरखेड: एक गाव : राजीव पाटील दिग्दर्शित 'सावरखेड: एक गाव' हा चित्रपट एप्रिल 2004 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, संज्योत हर्डीकर, मकरंद अनासपुरे आणि बाकी इतर कलाकार दिसले होते. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटात सावरखेड हे एक आदर्श गाव आहे, जिथे लोक काही विरोधी विचार असूनही शांततेत एकत्र राहतात. मात्र एका आमदाराचा मुलगा राहुल परदेशातून परत आल्यानंतर तिथे काही विचित्र गोष्टी घडतात असं दाखविण्यात आलं आहे.

3 यंदा कर्तव्य आहे : अंकुश चौधरी स्टारर 'यंदा कर्तव्य आहे' हा चित्रपट खूप मजेशीर आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. हा चित्रपट 20 एप्रिल 2006 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकुश (राहुल) त्याच्या आजारी आजीच्या सांगण्यावरून स्मिता शेवाळे (स्वाती)शी लग्न करतो, ते त्यांच्या हनिमूनवर एकमेकांना ओळखतात आणि अखेर दोघांमध्ये प्रेमाचे फुल फुलते. या चित्रपटात अंकुश चौधरी स्मिता शेवाळे व्यतिरिक्त आत्माराम भेंडे आणि मोहन जोशी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

4 ट्रिपल सीट : संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित 'ट्रिपल सीट' चित्रपट खूप मनोरंजक आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2019मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र फिरोदिया यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये एका तरुणाच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते, जेव्हा त्याला एका अनामिक महिलेचा फोन येतो, यात त्याला म्हटलं जातं की, त्याचा जीव धोक्यात आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी व्यतिरिक्त शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, राकेश बेदी, वैभव मांगले आणि प्रवीण तरडे यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

5 रिंगा रिंगा : संजय जाधव दिग्दर्शित 'रिंगा रिंगा' हा चित्रपट खूप विशेष आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, अदिती गोवित्रीकर, अजिंक्य देव आणि भरत जाधव यांनी विशेष भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते सुरेश पै आणि कांचन सातपुते हे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.