मुंबई :बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईतील वातावरण खूपच भीतीदायक झालं आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या जवळचे लोकही घाबरून आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे.अलीकडेच सलमान खानच्या घराची रेकी करून आणि त्याला धमकी देणाऱ्यांना हरियाणामधून अटक करण्यात आली होती. आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिच्या इन्स्टाग्राम पोस्टनं खळबळ उडवून दिली आहे. सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून लॉरेन्स बिश्नोईचा फोन नंबर मागितला आहे.
सोमी ही लॉरेन्सच्या फायद्यांबद्दल बोलणार : 16 ऑक्टोबरच्या रात्री, सोमी अलीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉरेन्स बिश्नोईचा एक फोटो शेअर केला आणि यावर लिहिलं, 'हॅलो, लॉरेन्स बिश्नोई भाई, मी ऐकले आणि पाहिले आहे की, तुम्ही जेलमधून झूम वरून कॉल करत आहात. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, कृपया मला सांगा की हे कसं शक्य होईल. संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे, आम्हाला तुमच्या मंदिरात यायचे आहे, पूजा करायची आहे. मात्र त्यापूर्वी, एक झूम कॉल तुमच्याशी करून बोलायचं आहे. याशिवाय मंदिरात पुजेनंतर तुमच्या फायद्याच्या गोष्टी होईल, यावर विश्वास ठेवा. मला तुमचा मोबाईल नंबर द्या, खूप मोठे उपकार होईल, धन्यवाद.'