ETV Bharat / entertainment

रक्तानं लाल पांढऱ्या शर्टवाल्याला रुग्णालयात सोडलं, नंतर कळलं तो सैफ अली खान होता, ऑटो रिक्षावाल्यानं सांगितला अनुभव - AUTO DRIVER ON SAIF ALI KHAN

जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्शा चालकाला गाडीत अभिनेता आहे याची कल्पना नव्हती. तो नेमकं काय नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

Saif Ali Khan And Auto Rickshaw
सैफ अली खान आणि ऑटो रिक्षा (Etv File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 8:30 PM IST

Updated : Jan 17, 2025, 9:40 PM IST

मुंबई : सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूनं हल्ला झाल्यानंतर त्याला त्याच्या वांद्रे इथल्या घरापासून जवळच्या लीलावती रुग्णालयात ऑटो रिक्शनं नेण्यात आलं होतं. त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरासमोरुन जात आसलेल्या रिक्षाला थांबवण्यात आलं आणि त्यातून जखमी सैफ अली खान त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान आणि छोटा मुलगा मुलगा तैमूर यांनी प्रवास केला.

ऑटो रिक्षा चालक काय म्हणाला? : आपल्या रिक्षात सैफ अली खान बसला आहे किंवा जखमी व्यक्ती हा सैफ अली आहे, याचा थांगपत्ता ऑटो रिक्षा चालक भजन सिंग राणा याला नव्हता. "आम्ही रुग्णालयाच्या गेटवर पोहोचलो तेव्हा त्यानं गार्डला स्ट्रेचर आणण्यासाठी जवळ बोलावलं आणि तो सैफ अली खान असल्याचं त्यानं सांगितलं," असं रिक्षा चालकानं शुक्रवारी मुंबईत पत्रकारांना सांगितलं.

पांढरा कुर्ता रक्तानं माखला होता : तो म्हणाला की, "जेव्हा तो अभिनेता सैफ अली खान राहत असलेल्या सतगुरु दर्शन इमारतीजवळून जात होता, तेव्हा एका महिलेनं आणि इतर काही जणांनी त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. मग ज्या व्यक्तीचा पांढरा कुर्ता रक्तानं माखला होता, तो ऑटोमध्ये चढला. मला त्याच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाल्याचं लक्षात आलं, पण हाताला दुखापत झाली नव्हती," असं तो म्हणाला.

रिक्षात खानचा मुलगा ही चढला होता : "तो (सैफ) ऑटोमध्ये चढला. रिक्षात एक सात-आठ वर्षांचा मुलगाही चढला होता," असं राणा म्हणाला. सैफ अली खानचा मुलगा तैमूरही त्याच्याबरोबर रुग्णालयात गेला होता का? असं विचारलं असता राणानं उत्तर दिलं. "आधीचा प्लॅन वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये जाण्याचा होता पण नंतर सैफनं त्याला वांद्रे येथीलच लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं," असं रिक्षाचालक म्हणाला.

३ वाजताच्या सुमारास ऑटो हॉस्पिटलमध्ये पोहोचली : "आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा त्यानं गेटवरील गार्डला हाक मारली आणि त्याला सांगितलं: कृपया स्ट्रेचर आणा. मी सैफ अली खान आहे," तो म्हणाला, ऑटो पहाटे ३ वाजताच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. सात ते आठ मिनिटात त्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर ड्रायव्हरनं सांगितलं की त्यानं त्याच्याकडून भाडं घेतलं नाही.

इब्राहिम अली खानचा उल्लेख : "तो (सैफ अली खान) ऑटोमध्ये त्या मुलाशी बोलत होता, ऑटोमध्ये आणखी एक तरुण मुलगाही होता", असं राणा म्हणाला. तो त्या मुलाचा म्हणजे सैफ अलीची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा २३ वर्षीय मुलगा इब्राहिम अली खानचा उल्लेख करत होता.

हेही वाचा -

  1. सैफची प्रकृती स्थिर; मात्र एक आठवडा विश्रांतीची गरज, मेडिकल बुलेटिनमधून डॉक्टरांची माहिती
  2. सैफ अली खान यांच्यावरील हल्ला धार्मिक कट्टरतावाद्यांकडून झाला का? आमदार जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त
  3. सैफ अली आयसीयूमधून बाहेर; तो रक्तानं माखलेला 'सिंहासारखा आत आला'; एकाला ताब्यात घेतलं; करीनाचं विधान आणि बरंच काही...

Last Updated : Jan 17, 2025, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.