ETV Bharat / entertainment

शाहरुख खानपासून संजय दत्तपर्यंत बॉलिवूड स्टार आहेत सलमान खानच्या होस्टिंगचे फॅन - BIGG BOSS 18 GRAND FINALE

सलमान खानच्या सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस'च्या १८ व्या सीझनचा उद्या ग्रँड फिनाले होणार आहे. यानिमित्तानं सलमानच्या होस्टिंगबद्दल अनेकांनी कौतुक केलंय.

Salman Khan and Shahrukh Khan
सलमान खान आणि शाहरुख खान ((PR))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 18, 2025, 4:38 PM IST

मुंबई - सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार असला तरी त्यानं उत्तम होस्ट असल्याचं अनेक इव्हेन्ट्समधून सिद्ध केलंय. भारतातील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा अजिंक्य होस्ट म्हणूनही त्यानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. चौथ्या सीझनपासून या शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानन त्याच्या करिष्माई उपस्थितीसह, हजरजबाबीपणा, उत्स्फुर्त विनोद आणि आकर्षक स्टाईलनं या शोला ताजे तजलदार ठेवलंय. केवळ प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडचे मोठे स्टार देखील सलमानला शोचा सर्वोत्तम होस्ट मानतात आणि म्हणतात की त्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. बॉलिवूड स्टार्सनी सलमान खानची बिग बॉसचा सर्वोत्तम आणि अजिंक्य होस्ट म्हणून प्रशंसा केली अशा काही संस्मरणीय क्षणांवर एक नजर टाकूयात.

शाहरुख खान केलं 'अद्भुत' होस्टचं कौतुक - बिग बॉस सीझन १२ च्या 'वीकेंड का वार' या खास भागामध्ये जेव्हा शाहरुख खान आला होता तेव्हा त्यानं सलमानच्या होस्टिंग कौशल्याचं कौतुक केलं होतं.'अप्रतिम होस्ट' म्हणत किंग खाननं त्याचं गुणगान केलं होतं. सलमानच्या उत्स्फूर्ततेचे आणि प्रेक्षकांशी जोडण्याच्या क्षमतेचंही त्यानं कौतुक केलं आणि सांगितलं की सलमानसारखं कोणीही होस्ट करू शकत नाही.

Salman Khan and Anil Kapoor
सलमान खान आणि अनिल कपूर ((PR))

अनिल कपूरनं केला सलमानच्या वारशाला सलाम - बिग बॉस ओटीटी ३ चे सूत्रसंचालन करणारे अनिल कपूर यांनीही सलमानच्या शोमधील योगदानाचं कौतुक केलं होतं. अनिलनं कबूल केलं की, सलमानचा करिष्मा आणि त्याची सूत्रसंचालन स्टाईलची दुसऱ्या कुणाशीही तुलनाच होऊ शकत नाही. अनिलच्या या कबुलीमुळे बिग बॉसमधील सलमानचा मजबूत वारसा आणखी अधोरेखित होऊन जातो.

Salman Khan and Sanjay Dutt
सलमान खान आणि संजय दत्त ((PR))

संजय दत्तनही केला सर्वोत्तम यजमानाला सलाम - जेव्हा संजय दत्त आणि सलमान खान यांनी बिग बॉस सीझन ५ चे सह-होस्टिंग केलं तेव्हा त्यांच्या जोडीनं शो आणखी खास बनवला. संजयनं सलमानला "सर्वोत्तम होस्ट" म्हटलं होतं आणि सलमानमुळेच त्याला अधिक आत्मविश्वास वाटला हेही मान्य केलं होतं. त्यानं सांगितले की सलमाननं त्याच्याबरोबर काम करणं सहज सोपं केलं, त्यामुळे शोचा अनुभव आणखी चांगला झाला.

Salman Khan and Arshad Warsi
सलमान खान आणि अर्शद वारसी ((PR))

'सर्वोत्तम निवड' म्हणत अर्शद वारसीनं केलं कौतुक - बिग बॉस सीझन १ चा होस्ट अर्शद वारसीनंही सलमानच्या होस्टिंग कौशल्याचं कौतुक केलं. तो म्हणाला, 'मला वाटतं सलमान खान हा बिग बॉससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्याची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. या शोला सलमान सारख्या 'दबंग' ची गरज आहे. अर्शदच्या या शब्दांमुळे सलमानचा शोवरील प्रभाव आणखी बळकट झाला. सलमानची अनोखी स्टाईल हे शोच्या यशाचं मोठं कारण असल्याचं तो म्हणाला.

शाहरुख खानच्या कौतुकापासून ते अनिल कपूरच्या नम्र स्वीकारापर्यंत, बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सनी सलमान खानच्या सूत्रसंचालनचं कौतुक केलं आहे. सलमाननं प्रत्येक सीझनमध्ये हे सिद्ध केलं आहे की त्याच्या होस्टिंगची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. त्याची अनोखी शैली, स्पर्धकांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कला यामुळे तो बिग बॉसच्या जगात एक अजिंक्य होस्ट बनला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.