ETV Bharat / entertainment

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'ला पहिल्या दिवशी संथ सुरुवात, जाणून घ्या तिच्या अगोदरच्या कमाईविषयी - EMERGENCY BOX OFFICE DAY 1

कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद देत आहे. तिच्या तेजस आणि थलायवी चित्रपटांपेक्षा याची कमाई जास्त आहे.

Kangana Ranaut's film 'Emergency'
कंगना रणौत 'इमर्जन्सी' ('Emergency' poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 18, 2025, 12:37 PM IST

मुंबई - 'कंगना राणौत'च्या खूप गाजावाजा झालेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर, आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटातील सर्वात कमी ओपनिंग देणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तीन वर्षांनी १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पंजाबमध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं सिनेमाला विरोध केल्यानं या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.

'इमर्जन्सी' चित्रपटाचं कंगना पहिल्यांदाच स्वतंत्रपणे दिग्दर्शन करत असल्यामुळे तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान तिच्यासमोर होतं. प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्याचंही आव्हान तिच्यासाठी आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच ती अभिनयही करत आहे. शिवाय तिच्या मणिकर्णिका फिल्म्स बॅनरनं हा सिनेमा झी स्टुडिओजसह बनवला आहे. कंगनानं आधीच दावा केला आहे की, तिनं या प्रोजेक्टसाठी तिच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता पणाला लावल्या आहेत. तिला हा चित्रपट पडद्यावर आणण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे.

'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिस कलेक्शनचा पहिला दिवस - 'इमर्जन्सी' चित्रपटानं पहिल्या दिवशी अंदाजे २.४ कोटी रुपये कमावले असल्याचं फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क यांनी सुरुवातीच्या अंदाजातून सांगितलं आहे. या राजकीय नाट्यमय चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट २५०० स्क्रीनवर राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची स्पर्धा अजय देवगणचा पुतण्या अमान देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या 'आझाद'शी आहे.

'इमर्जन्सी' ची संथ गतीनं सुरुवात - 'इमर्जन्सी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली नसली तरी, 'तेजस' आणि 'थलाईवी' सारख्या कंगनाच्या काही सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चित्रपटांपेक्षा तो किंचित चांगला राहिला आहे. कंगनानं सातत्यानं सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला कलाकारांचा दावा कायम ठेवला आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत तिच्या नशिबानं तिला बॉक्स ऑफिसवर चांगली साथ दिलेली नाही.

ऑक्युपन्सी - 'इमर्जन्सी' ची पहिल्या दिवशी एकूण ऑक्युपन्सी केवळ १९.२६% इतकी होती, मुंबईत ४६७ शो आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ६५७ शो सुरू होते. त्या तुलनेत, कंगनाच्या मागील 'थलाईवी' (२०२१) आणि 'धाकड' या चित्रपटांना आणखी कमी ओपनिंग मिळालं होतं, 'धाकड' चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तिची भूमिका असलेल्या 'तेजस'नंही १.२५ कोटी रुपयांची कमकुवत सुरुवात केली होती.

कंगनाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड - कंगनाच्या आधीच्या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळाली होती. 'कट्टी बट्टी' (२०१५) नं पहिल्या दिवशी ५.३ कोटी रुपये आणि 'रंगून' (२०१७) नं ५.१ कोटी रुपये कमावले होते. व्यावसायिकदृष्ट्या निराशाजनक ठरलेल्या 'सिमरन'नंही २.७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१९ मध्ये आलेल्या तिच्या 'मणिकर्णिका' चित्रपटानं पहिल्या दिवशी ८.७५ कोटी रुपयांची खूपच चांगली कमाई केली होती. परंतु, कंगनाचा शेवटचा मोठा हिट चित्रपट 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' (२०१५) राहिला आहे. या चित्रपटानं जागतिक स्तरावर २५८ कोटी रुपये कमावले होते.

२०१९ पासून कंगनाच्या चित्रपटांच्या कामगिरीवर एक नजर:

  • मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) ८.७५ कोटी रुपये
  • पंगा (२०२०) २.७० कोटी रुपये
  • थलाईवी (२०२१) १.४६ कोटी रुपये
  • धाकड (२०२२) १.२ कोटी रुपये
  • चंद्रमुखी २ (२०२३) ८.२५ कोटी रुपये
  • तेजस (२०२३) १.२५ कोटी रुपये
  • 'इमर्जन्सी' (२०२5) २.४ कोटी रुपये (प्रारंभिक अंदाज)

(बॉक्स ऑफिस डेटा स्रोत: सॅकनिल्क)

हा चित्रपट १९७५ ते १९७७ या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या वादग्रस्त आणीबाणीच्या काळाचं दर्शन घडवतो. परंतु या चित्रपटाला शीख समुदायानं विरोध केल्यामुळे पंजाबमध्ये प्रदर्शन होऊ शकलं नाही. चित्रपटात शिखांचं नाव बदनाम केल्याचं आणि संपूर्ण इतिहास विकृतपणे दाखवण्यात आला असल्याचं कारण देत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी शीख समुदायाच्या एसजीपीसीनं केली आहे.

हा चित्रपट कला आणि कलाकाराचा पूर्णपणे छळ आहे, पंजाबमधील अनेक शहरांमध्ये असे म्हटलं जात आहे की हे लोक 'इमर्जन्सी' प्रदर्शित होऊ देत नाहीत. 'इमर्जन्सी' चित्रपटाला पंजाबमध्ये विरोध झाल्यानंतर कंगनानं निराश व्यक्त केली होती. "मला सर्व धर्मांबद्दल अत्यंत आदर आहे आणि चंदीगडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी शीख संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण केले आहे." असं सोशल मीडियावर तिनं लिहिलं आहे.

'इमर्जन्सी' या चित्रपटात कंगना रणौतसह अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत आणि हा दिवंगत सतीश कौशिक यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.