ETV Bharat / technology

BMW X3 SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये... - BHARAT MOBILITY EXPO 2025

BMW नं भारतीय बाजारपेठेत 2025 BMW X3 SUV भारत मोबिलिटी एक्सपो 2025 मध्ये लॉन्च केली आहे.

BMW X3 SUV
BMW X3 SUV (BMW India)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 18, 2025, 4:42 PM IST

हैदराबाद : भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये BMW नं एक्स३ कार लाँच केलीय. या कारला पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आलं आहे. यासोबतच BMW X3 मध्ये नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नवीन X3 मध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर इंजिन आहे. त्याची केबिन खूपच आलिशान आहे. त्यात अपहोल्स्ट्री आणि पॅनोरॅमिक सनरूफ देखील आहे.

बीएमडब्ल्यू एक्स3 वैशिष्ट्ये
नवीन बीएमडब्ल्यू एक्स3 त नवीन डिझाइनसोबतच, त्यात नवीन वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. कंपनी तिचं इंटीरियर पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि आलिशान बनवणलं आहे. नवीन BMW X3 कोणत्या नवीन वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आली जाणून घेऊया...

नवीन BMW X3 चा बाह्य भाग
BMW X3 ला नवीन डिझाइन देण्यात आलं आहे. यात समोर एक मोठे ग्रिल आहे, ज्यामध्ये आडवे आणि कर्णरेषीय स्लॅट्स असून एलईडी लाईट्स आहेत. त्याच वेळी, दोन्ही बाजूंना एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स समाविष्ट केले आहेत. नवीन BMW X3 मध्ये रुंद व्हील आर्च आणि 4 व्हील आकाराचे पर्याय देखील आहेत. मागून पाहिल्यावर ती खूपच स्पोर्टी दिसते. ज्यामध्ये एक लहान विंडशील्ड आणि नवीन टेल लाईट्स देखील देण्यात आले आहेत.

केबिन पूर्णपणे रिसायकल
नवीन BMW X3 मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. यात एसी व्हेंट, इंटरॅक्शन बार आणि ॲम्बियंट लाइटिंग आहे. सेंटर कन्सोलमध्ये कॅमेरा, व्हॉल्यूम, नेव्हिगेशन आणि इतर फंक्शन्ससाठी गिअर नॉब आणि इतर बटणे आहेत. त्यातील स्टीअरिंग व्हील अगदी नवीन आहे. त्याचं केबिन पूर्णपणे रिसायकल केलं गेलं आहे. त्यात अपहोल्स्ट्री आणि पॅनोरॅमिक सनरूफ देखील आहे.

बीएमडब्ल्यू एक्स३ ची पॉवरट्रेन
इंजिनबद्दल बोलायचं झालं तर, BMW X3 मध्ये 2.0 -लिटर चार-सिलेंडर इंजिन आहे. त्याचं पेट्रोल इंजिन 206 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करतं. तर डिझेल इंजिन 197 बीएचपीची पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क जनरेट करतं. ही दोन्ही इंजिनं आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेली आहेत.

किंमत
नवीन BMW X3 चं पेट्रोल व्हर्जन 75,80,000 रुपये एक्स-शोरूम किमतीत आणि डिझेल व्हर्जन 77,80,000 रुपये किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. भारतीय बाजारपेठेत, ते मर्सिडीज-बेंझ GLC, ऑडी Q5 आणि व्होल्वो XC60 शी स्पर्धा करेल.

हे वाचंलत का :

  1. टोयोटाच्या बहुप्रतिक्षित टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीचा पहिला लूक आला समोर, जाणून घ्या काय असेल खास?
  2. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये 'या' कार झाल्या सादर? जाणून घ्या A टू Z माहिती
  3. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी ई विटाराची एंट्री, काय आहे खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.