ETV Bharat / bharat

डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : संजय रॉय दोषी असल्याचं न्यायालयानं केलं जाहीर, सोमवारी ठोठावणार शिक्षा - RG KAR DOCTOR GIRL RAPE MURDER CASE

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन खून करण्यात आला. या प्रकरणी सियालदाह न्यायालयानं संजय रॉय याला दोषी जाहीर केलं आहे.

RG Kar Doctor Girl Rape Murder case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 4:58 PM IST

डॉक्टर बलात्कार खून प्रकरण : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी सियालदाह न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी आज सियालदाह न्यायालयानं आपला निकाल जाहीर केला. न्यायालयानं संजय रॉय याला डॉक्टर तरुणी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी घोषित केलं आहे. सोमवारी या प्रकरणात दोषी संजय रॉय याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरणी संजय रॉय दोषी : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना 9 ऑगस्टला घडली. या घटनेमुळे देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केल्यानं प्रकरण चांगलंच चिघळलं. त्यानंतर 9 जानेवारी 2025 ला सियालदाह न्यायालयानं या प्रकरणी 18 जानेवारीला निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केली. आज या प्रकरणी न्यायालयानं निकाल जाहीर केला. या निकालानुसार संजय रॉय याला न्यायाधीशांनी दोषी ठरवलं आहे. संजय रॉय याला सोमवारी शिक्षा जाहीर करण्यात येणार असल्याचं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. निकाल जाहीर केल्यानंतर 24 तासाच्या आत शिक्षा जाहीर करण्यात येते. मात्र उद्या रविवार असल्यानं सोमवारी शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.

डॉक्टर तरुणीचा आढळला मृतदेह : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात9 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील एका सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आला. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झालं. या प्रकरणी सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी तपास केला. तत्कालीन महापौर विनीत गोयल यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला.

हेही वाचा :

  1. डॉक्टर बलात्कार खून प्रकरण ; पीडितेच्या पालकांचा इंटर्न डॉक्टरांवर गंभीर आरोप, संशयितांची नावं दिल्यानं खळबळ - Kolkata Doctor Murder Case
  2. महिला डॉक्टर हत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांचा उद्या देशव्यापी संप; आयएमएकडून 48 तासांचा अल्टिमेटम - Kolkata Doctor Murder Case
  3. घर मालकाचा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.