मुंबई - Salman Khan Y plus Security Team : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. अलीकडेच 'भाईजान'च्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, या प्रकरणी दोन आरोपींना मुंबई पोलिसांची ताब्यात घेतलं होतं. आता दुसरीकडे सलमान घरातून बाहेर पडला असून तो कडक सुरक्षेत काम करताना दिसत आहे. सध्या सलमान हा आगामी 'सिकंदर' चित्रपटच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. गेल्या ईदला 'भाईजान'नं त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती. दरम्यान 'सिकंदर'बाबत बातमी आहे की, सलमान हा कडक सुरक्षेत या चित्रपटाची शूटिंग करणार आहे.
सलमान खान करणार 'सिकंदर' शूटिंग :रिपोर्ट्सनुसार, सलमान खान पुढच्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान खान हा वाय प्लस सिक्युरिटीमध्ये त्याच्या चित्रपटाची शूटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर सलमान जिथे जिथे या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सलमान खानची सुरक्षा टीम तो सेटवर पोहोचण्याच्या 10 दिवस आधी नजर ठेवण्यासाठी जाणार आहे. यावेळी ही सुरक्षा टीम सेटवरचा प्रत्येक कोपरा चेक करणार आहे. सलमान, ज्या ठिकाणी जाईल त्याबद्दलची विशेष माहिती काही अधिकाऱ्यांना असणार आहे.