मुंबई - Salman Khan House Firing Case :अभिनेता सलमान खानच्या हाऊस फायरिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळालं आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानमधून अटक केली आहे. मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरीनं सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना मदत केली होती. याशिवाय चौधरीनं या शूटर्सला पैशाची मदतदेखील केली होती. मोहम्मद चौधरीला आज 7 मे रोजी जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सलमान खान हाऊस फायरिंग प्रकरणातील आरोपी अनुज थापननं मुंबई पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती.
सलमान खानच्या हाऊस फायरिंग प्रकरणी 5वा आरोपी ताब्यात : आरोपी अनुजला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषीत केलं होतं. 14 एप्रिल 2024 रोजी आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांनी सलमान खानच्या बाहेर चार राऊंड फायर केले होते. त्यापैकी एक गोळी सलमान खानच्या घराच्या भिंतीला लागली होती. यानंतर दोन्ही आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. पोलिसांनी या दोन आरोपींना कच्छमधून अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपींनी सुरतच्या तापी नदीत गोळीबाराची बंदूकी फेकल्याचं सांगितले होतं. दोन्ही आरोपींनी ही माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेनं त्यांना तापी नदीवर नेलं होत. तेथून दोन्ही पिस्तूल जप्त केल्या गेल्या होत्या.