महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ग्रामीण महाराष्ट्रातही दहीहंडीचा ज्वर, रिंकू राजगुरू झरीन खान उपस्थित.. - Mahadahi Handi - MAHADAHI HANDI

Dahi Handi : ग्रामीण महाराष्ट्रातही दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बुलढाणामधील चिखलीत देखील हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि झरीन खान यांनी हजेरी लावली होती. याशिवाय भाजपा आमदार श्वेता महाले यांनी देखील दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Dahi Handi
दहीहंडी (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 1:16 PM IST

बुलढाणा - Dahi Handi :विदर्भातील सर्वांत मोठी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महादहीहंडीचं आयोजन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव असतात, यामध्ये श्रावण सोमवारचे उपवास, दहीहंडी यांसारखे अनेक उत्सव साजरे केले जातात. याच धर्तीवर महायुतीच्या वतीनं विकासाच्या महादहीहंडीचं आयोजन केलं होतं.

दहीहंडी (reporter)


चिखलीत दहीहंडीचा कार्यक्रम :चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महादहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये युवकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. दहीहंडीच्या कार्यक्रमात अनेकजण या सणाच्या जल्लोषात मग्न दिसले. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीमध्ये लोकांची खूप गर्दी पाहायला मिळाली होती. यावेळी अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती.

दहीहंडीचा जोर संपूर्ण भारतात :मेट्रो सिटी प्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा जोर पाहायला मिळत आहे. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये साजरी केली जात असते. भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून ही दहीहंडी या ठिकाणी फोडली गेली होती. दहीहंडीत युवकांचा जल्लोष वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू तर बॉलिवूड अभिनेत्री जरीन खाननं देखील या कार्यमात हजेरी लावली होती. त्यामुळे मेट्रो सिटीप्रमाणेच बुलढाणाच्या चिखलीतही दहीहंडीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात आहे. आता सोशल मीडियावर या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, यामध्ये रिंकू राजगुरू ही कार्यक्रमामध्ये एंट्री करताना दिसत आहे. याशिवाय कार्यक्रमात जरीन खाननं देखील आपल्या उपस्थितीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. दहीहंडी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषानं साजरा केला जातो. देशामधील प्रत्येक राज्यमध्ये या सणाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. छोट्या मुलांच्या शाळामध्ये देखील हा दहीहंडीचा कार्यक्रम विशेष पद्धतीन साजरा केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details