मुंबई: 14 जानेवारी रोजी हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांच्या 'कहो ना... प्यार है' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्षे पूर्ण झाली. या विशेष प्रसंगी हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हृतिकनं त्याच्या पहिल्या चित्रपटातून लाखो लोकांची मनं जिंकली होती. या चित्रपटानंतरही 30 हजार मुलींनी हृतिकला लग्नासाठी प्रपोजल पाठवले होते. काही वर्षांनी, हृतिकला 'ग्रीक गॉड' म्हटलं जाऊ लागले. आता 'ग्रीक गॉड' हे नाव सर्वात आधी कोणी दिलं? याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अमिषा पटेलनं केला खुलासा : चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 25 वर्षांनी, अमिषानं सांगितलं की, तिच्या 'कहो ना प्यार है' मधील सह-अभिनेता अजूनही लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच, तो त्याच्या चाहत्यांसाठी 'फिटनेस आयकॉन' बनला आहे. जेव्हा अमिषाला विचारण्यात आले की, जेव्हा ती पहिल्यांदा हृतिकला भेटली तेव्हा तिच्यावर काय प्रभाव पडला. याबद्दल तिनं सांगितलं, "आम्ही फैमिली फ्रेंड्स होतो आणि मी त्याला किशोरावस्थेपासून ओळखत होते. तो एक पातळ, इंट्रोवर्ट आणि विचित्र व्यक्ती होता. पण जेव्हा मी बोस्टनमध्ये शिक्षण पूर्ण करून मुंबईत परतले आणि त्याला पाहिले तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता."
हृतिकला 'ग्रीक गॉड'चा दर्जा कसा मिळाला? : अमिषा पुढं सांगितलं, "असं वाटत होतं की जणू काही कॅटरपिलर बटरफ्लायमध्ये बदलला आहे. मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, 'सुपरस्टार!' पण हृतिकला हे सत्य पचवता आले नाही. आम्ही दोघेही मोठे झालो होतो. त्यामुळे आम्ही खूप बोलू लागलो होतो. आता त्यालाही बोलायला चांगलं वाटत होतं. त्यानंतर आम्ही सुरुवातीपासून एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं बोलू लागलो, मी त्याला पियर्स ब्रॉसनन, द बॉन्ड म्हणायची. 'ग्रीक गॉड' हा शब्द मीच त्याला दिला होता आणि आज मला त्याचा अभिमान आहे, कारण तो त्याला शोभतो. हा टॅग त्याच्याशी पहिल्या दिवसापासून जोडला गेला. आज तो खूप प्रसिद्ध झाला आहे.'"
'कहो ना... प्यार है' कधी झाला होता प्रदर्शित : 'कहो ना... प्यार है' हा चित्रपट 10 जानेवारीपासून थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. आता यामुळे हृतिक आणि अमिषाचे चाहते खूप आनंदी आहेत. हा चित्रपट 14 जानेवारी 2000 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केलं होतं. 'कहो ना... प्यार है' चित्रपटात हृतिक रोशन आणि अमिषा पटेल व्यतिरिक्त अनुपम खेर, दिलीप ताहिल, आशिष विद्यार्थी, मोहनीश बहल, फरीदा जलाल आणि सतीश शाह यांनी देखील महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.
हेही वाचा :