ETV Bharat / business

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळं महागाई वाढणार; कोणत्या दैनंदिन वस्तू महागणार? - RUPEE FALLS AGAINST DOLLAR

लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आशा असताना पुन्हा एकदा जनतेचा भ्रमनिराश झाला असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यामुळे परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Rupee falls against dollar
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 6:59 PM IST

मुंबई- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट आल्याचे दिसून येतंय. एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात होत असलेली पडझड आणि दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण यामुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट ओढावलंय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आस लावून बसलेल्या सामान्य लोकांचा पुन्हा एकदा भ्रमनिराश झाला असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यामुळे परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झालीय.

आयात वस्तू महाग होण्याची शक्यता : दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये एका डॉलरसाठी 83 रुपये मोजावे लागत होते. आता जवळपास 87 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. या घसरणीचा परिणाम म्हणजे भारतीय रुपयाचं डॉलरच्या तुलनेत मूल्य कमी झालंय. एका अमेरिकन डॉलरसाठी भारतात 87 रुपये द्यावे लागतात. या रुपयाच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवरती परिणाम दिसून येतोय. याचबरोबर दैनंदिन वस्तूसुद्धा महाग होत असून, दैनंदिन जीवनावर याचा परिणाम दिसून येतोय. विशेष म्हणजे या घसरणीमुळे परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, इंधन, कच्चे तेल तसेच अन्य ज्या वस्तूंची विदेशातून आयात केली जाते, त्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे, असं अर्थतज्ज्ञ विश्वास उटगींनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय.

भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट? : सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधन हे आपण विदेशातून आयात करतो. हे आयात करताना आपण डॉलर चलन देऊन इंधन विकत घेतो. रशिया किंवा अन्य देशांकडून आपणाला इंधनाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. परंतु रशियाने भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा करू नये, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला सूचना केल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे स्वाभाविकपणे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे इंधन, पेट्रोल आणि डिझेल यांचा पुन्हा एकदा भडका उडू शकतो. अमेरिका हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या देशात आमंत्रण देत नाहीत. देशात सध्या शेअर बाजारातील निर्देशांक दिवसेंदिवस घसरत आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली तर लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल आणि सामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा लोकांना होती. मात्र त्याच्या विपरीत परिस्थिती उद्भवली असल्यामुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती एक वेगळच संकट आलंय आणि या परिस्थितीतून बाहेर पडणं हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठं आव्हान आहे, असंही अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलंय.

या दैनंदिन वस्तू महागणार?
- इंधन
- मोबाईल आणि लॅपटॉप
- कडधान्य आणि डाळी
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर विश्वास उटगींचं विश्लेषण (Source- ETV Bharat)

काय परिणाम दिसतील...
- भारतीय चलन रुपयाची घसरण आणि रुपया कमकुवत झाल्यामुळं भारतीय वस्तू विदेशी बाजारात स्वस्त होतील
- परिणामी भारत देशातील वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता
- विदेशीतील पर्यटकांचे भारतातील पर्यटन स्वस्त होईल. परिणामी पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल
- परकीय कर्ज काढणे देखील आणि ते फेडणे महाग होईल
- परदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होईल
- विदेशी चलनसाठा कमी होईल, त्याचे थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधान मोदी मुंबई डॉकयार्डवर दाखल ;थोड्याच वेळात युद्धनौकांसह पाणबुडीचं करणार लोकार्पण
  2. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अरविंद केजरीवाल अडचणीत, नामांकन दाखल करण्यापूर्वीच मोठी घडामोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.