ETV Bharat / state

धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी - BROTHER IN LAW RAPED ON WOMAN

घरी कोणी नसल्याची संधी साधत दिरानं वहिनीवर बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. या पीडितेचा पतीही तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्यानं पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Brother In Law Raped On Woman
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 9:11 PM IST

ठाणे : वाहिनीवर दिरानं राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. विशेष बाब म्हणजे पीडितेचा पतीही मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. अखेर पती आणि दीर या दोघांपासून होणारा वारंवार अत्याचार असहाय्य झल्यानं पीडितेनं महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन दीर, पती, या दोघांसह त्यांना साथ देणाऱ्या सासू आणि नणंदेवरही भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

दिराचा वाहिनीवर बलात्कार : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 30 वर्षीय महिला ही मुंब्रा भागात राहणारी असून तिचा विवाह कल्याण पश्चिम भागातील जोशीबाग भागात राहणाऱ्या तरुणाशी मे 2014 रोजी थाटात झाला. त्यानंतर 2022 पर्यंत सुखानं संसार सुरू असतानाच पीडितेचा पती रात्री घरी आल्यावर तिला अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. यावरून दोधांमध्ये वादही झाले, शिवाय सासू आणि नणंद यांनाही पती करत असलेल्या घृणास्पद कृत्याची माहिती दिली. मात्र पती असल्यानं तो काही करणार म्हणून तिलाच शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं पीडित पत्नीनं तक्रारीत नमूद केलं आहे.

पतीचे स्त्रियांशी प्रेमप्रकरण : खळबळजनक बाब म्हणजे पतीचे बाहेर देखील इतर स्त्रियांशी प्रेमप्रकरण असल्याचं पीडितेला समजलं. त्यावेळी सदर बाबत पतीस विचारणा केली असता, त्यानं पीडित पत्नीला बेदम मारहाण केली. पीडित पत्नीनं तक्रारीत नमूद केलं आहे, दुसरीकडं पतीचे कुटूंब एका कार्यक्रमानिमीत्तानं घराबाहेर गेले असता, पीडिता घरी एकटी होती. याच संधीचा फायदा घेऊन विवाहित असलेल्या दिरानं पीडितेशी लगट करत अश्लील चाळे केले. त्यानंतर या घटनेची माहिती पती आणि सासूला दिली असता उलट पीडितेलाच दोघांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळं दिराची हिंमत वाढली. त्यानंतर पुन्हा पीडित घरात एकटी असतानाच दिरानं 20 डिसेंबर 2024 रोजी बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.

दिरावर बलात्काराचा तर पतीवर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा : दरम्यान पती, दिराच्या तसेच सासू आणि नणंदेच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेल्या घटनांचं पीडितेनं कथन केलं. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64 (1) 75 74 85 35, 2,3 (5) नुसार गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिरावर अत्याचाराचा तर पतीवरही अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू आणि नणंदेवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. चौकशी अंतीच आरोपीवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. करिअर समुपदेशनाच्या नावाखाली तरुणींचं लैंगिक शोषण : वासनांध मानसोपचार तज्ज्ञाला ठोकल्या बेड्या
  2. मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; नराधमाला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या
  3. आईशी भांडण करुन तरुणी रागात मध्यरात्री निघाली रोडवर; टोळक्यानं अपहरण करुन केला सामूहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.