मुंबई - बलिवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाल्यानंतर अभिनेत्री दिशा पटानी उड्डाण घेण्याच्या तयारीत आहे. तिला हॉलिवूडचा चित्रपट ऑफर झाला असून तिनं शूटिंगला सुरुवातही केली आहे. ही बातमी कळल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याचं एक कारण मिळालं आहे. अलिकडेच, दिशा पटानीचा पडद्यामागील (BTS) एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दिशा 'फास्ट अँड फ्युरियस' स्टार टायरेस गिब्सन आणि अभिनेता हॅरी गुडविन्स यांच्या बरोबर दिसत आहे. हे तिघे सध्या मेक्सिकोतील डुरंगो येथे एका आगामी वेब सिरीजचे शूटिंग करत आहेत. ही मालिका म्हणजे दिशाचं हॉलिवूडच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे.
दिशाच्या हॉलिवूड पदार्पणाची सध्या खूप चर्चा सुरू आहे आणि तिच्या या बीटीएसच्या फोटोमुळे उत्साहात भर पडली आहे. या फोटोमध्ये दिशा तिच्या सहकलाकारांबरोबर मजामस्तीचा एक हलकाफुलका क्षण शेअर करताना दिसत आहे. दिशाच्या आधीच प्रभावी ठरलेल्या कारकिर्दीत ही वेब सिरीज एक रोमांचक भर पडेल अशी अपेक्षा आहे.
दिशा पटानी अहमद खान दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'वेलकम टू द जंगल' मध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे आणि २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. दिशाचे चाहते आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही आघाड्यांवर तिचा अभिनय पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
दिशा पटानी हिनं साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर सायन्स फिक्शन 'कल्की २८९८ एडी' या पौराणिक चित्रपटामध्ये दिसली होती. 'कल्की' मध्ये तिनं अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर ११०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.