पुणे : खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत, या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पौष पोर्णिमेला गाढवांचा बाजार (Donkey Market) भरतो. या बाजारात देशभरातून गाढवं विक्रीला आणली जातात. यात गुजरातच्या काठेवाडी गाढवाला (Gujarat Kathiyawadi Donkey) चांगला दर मिळला. तर देशी गाढवाला जेमतेम दर मिळला. इथं येणारे भाविक डोंगर दरीतील कामासाठी गाढवाची खरेदी करतात. यावेळी या बाजारात लाखो रुपयाची उलाढाल झाली. यात पुण्याच्या गाढवांपेक्षा गुजरातच्या काठेवाडी गाढवांना सर्वाधिक भाव मिळाला. पाहुया याबाबतचा हा खास रिपोर्ट.
25 हजारांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत गाढवांना भाव : जेजुरी इथल्या गाढवांच्या बाजारात देशभरातून गाढवं विक्रीला आणली. यात गुजरातच्या काठेवाडी गाढवांना 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयापर्यंत भाव मिळला. गावठी गाढवांना 25 हजारांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत भाव मिळला. मात्र, बाजारात यंदा गाढवांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं गाढवांना चांगला भाव मिळला. गाढवाचे दात, वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड, जवान असं म्हटलं जाते. अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळते.
गाढवांची खरेदी-विक्री : पौष पौर्णिमेला जेजुरी येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत आहेत. तसेच, गाढवावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या या भटक्या जमातींतील हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले. कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवांची खरेदी-विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेतात.
माळेगावची 'श्री क्षेत्र खंडोबा' यात्रा : दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावच्या 'श्री क्षेत्र खंडोबा' यात्रेची (Malegaon Yatra) ओळख आहे. जेजुरीनंतर माळेगावतील यात्रेत सर्वात मोठा गाढवांचा बाजार इथं भरतो. या यात्रेत गाढवांचा बाजार भरवण्याची परंपरा ही मागील 400 ते 500 वर्षापासून आहे. येथील यात्रेत गाढवांचा व्यवहार हा कॅशलेस पद्धतीनं केला जातो. यावर्षी गाढव घ्या आणि पुढच्या वर्षी पैसे द्या अशी प्रथा व्यापारी आणि ग्राहकांमध्ये आहे. गाढवाचे व्यापारी हा व्यवसाय अनेक वर्षापासून करत आहेत. कुठलाही लिखित व्यवहार न करता गाढवांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केवळ देवाच्या भरोशावरच केला जातो. श्रीक्षेत्र खंडोबाच्या नावावर चांगभलं म्हणत हा व्यवहार केला जातो.
हेही वाचा -