ETV Bharat / sports

100/3 ते 131 वर ऑल आउट... पाहुण्यांची घसरगुंडी, भारताचा सर्वात मोठा विजय - IND W VS IRE W

भारतीय महिला संघानं तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात आयरिश संघाचा तब्बल 304 धावांनी पराभव करत नवा इतिहास लिहिला आहे.

IND W vs IRE W 3rd ODI
प्रतिका रावलने 129 चेंडूत 20 चौकार आणि 1 षटकारासह 154 धावा केल्या (IANS)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 15, 2025, 6:28 PM IST

राजकोट INDW Beat IREW: भारतीय महिला क्रिकेट संघानं तिसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाचा तब्बल 304 धावांनी पराभव करत मालिका 3-0 नं जिंकली. या सामन्यात भारताकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या विजयासह भारतीय महिला संघानं इतिहास रचला आहे.

भारताचा धावडोंगर : या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंनधाना हिनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. या सामन्यात संघानं प्रथम फलंदाजी करत 435 धावांचा डोंगर उभारला, ज्याच्या प्रत्युत्तरात आयर्लंड संघ 131 धावांवर सर्वबाद झाला आणि भारतीय महिला संघानं वनडे क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला.

पहिल्यांदाच 300 हून अधिक धावांनी विजय : यापूर्वी, 2017 मध्ये, भारतीय महिला संघानं‌ आयर्लंड विरुद्धचा वनडे सामना 249 धावांनी जिंकला होता, ज्यामध्ये भारतीय संघाची कर्णधार मिताली राज होती. आता स्मृती मंनधानाच्या नेतृत्वाखाली भारतानं हा विक्रम मागे टाकला आणि 304 धावा करत इतिहास रचला. कारण पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं 300 हून अधिक धावांनी वनडे सामना जिंकला आहे आणि हे केवळ मंधानाच्या नेतृत्वाखालीच घडलं आहे.

प्रतिका रावल- स्मृती मंनधाना यांची तुफानी खेळी : या सामन्यात प्रतिका रावल आणि स्मृती मंनधाना टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या मॅचविनर होत्या. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान प्रतिका रावलने 129 चेंडूत 20 चौकार आणि 1 षटकारासह 154 धावा केल्या. त्याचवेळी स्मृती मंधानानं 80 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी केली. वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी ती भारतीय फलंदाज ठरली. या खेळीत तिनं 12 चौकार आणि 7 षटकार मारले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.