ETV Bharat / state

रंगीत ढोबळी मिरचीतून 25 लाख रुपयांचं उत्पन्न; सावरगाव तळच्या शेतकर्‍याची यशोगाथा - SHIRDI DHOBALI CHILI STORY

संगमनेरमधील सावरगाव तळ येथील माधव नेहे या शेतकर्‍याने एक एकर शेतात उभारलेल्या शेडनेट हाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे पीक घेतले असून, 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय.

success story of a farmer from Savargaon Tal
सावरगाव तळच्या शेतकर्‍याची यशोगाथा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 5:55 PM IST

Updated : Jan 15, 2025, 6:58 PM IST

अहिल्यानगर - सातत्याने शेतकर्‍यांवर विविध संकटे येत असतात. मग कधी अतिवृष्टी तर कधी ढगाळ वातावरण अशा विविध संकटांनी गेल्या काही वर्षांपासून शेतकरी मेटाकुटीस आलेत. मात्र अशा कठीण परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील माधव बबन नेहे या शेतकर्‍याने एक एकर शेतात उभारलेल्या शेडनेट हाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे पीक यशस्वीरीत्या घेतले असून, आतापर्यंत 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय.

आठ ते नऊ टन माल निघणार- चारही बाजूंनी डोंगरदऱ्यात संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव वसलेले आहे. येथील शेतकरी नेहमीच आपापल्या शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. माधव नेहेदेखील अशाच पद्धतीने शेती करीत आहेत. एक एकर शेतीमध्ये त्यांनी शेडनेट हाऊस उभारलंय. सप्टेंबर महिन्यात त्यांनी मल्चिंग पेपरवर रंगीत ढोबळी मिरचीच्या रोपांची लागवड केली होती. यानंतर डिसेंबर महिन्यात मिरची लागण्यास सुरुवात झाली. मिरचीला सुरुवातीला प्रतिकिलोस 95 रुपयांचा भाव मिळाला. त्यानंतर 310 रुपयांचा प्रतिकिलोस भाव मिळालाय. आतापर्यंत 24 टन माल गेला असून, 25 लाख रुपयांहून फायदा झालाय. आणखी आठ ते नऊ टन माल निघणार असून, बाजारभावही टिकून आहे.

स्वतः जागेवर मिरची खरेदी करण्यासाठी गर्दी- विशेष बाब म्हणजे व्यापारी स्वतः जागेवर मिरची खरेदी करण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत खते-औषधे, मोलमजुरी, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन असा एकूण सात लाख रुपयांच्या आसपास खर्चदेखील झालाय. तर दुसरीकडे अजूनही मिरचीचे पीक सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ढोबळ्या रंगीत मिरचीच्या पिकाची काळजी घेतलीय. शेडनेट हाऊसमध्ये पीक असल्याने त्याचे अनेक फायदे होतात. सध्या प्रत्येक मिरचीच्या झाडाची उंची ही जवळपास पाच ते सहा फुटांपर्यंत आहे. वेळेवर खते-औषधे फवारणी केल्यामुळे हे पीक खऱ्याअर्थाने यशस्वी झाले. विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेत. मात्र अशा कठीण परिस्थितीतही माधव नेहे या शेतकर्‍याने हे पीक यशस्वी करून दाखवलंय.

सावरगाव तळच्या शेतकर्‍याची यशोगाथा (Source- ETV Bharat)

मिरचीचे पीक घेण्यात शेतकरी यशस्वी- यापूर्वी आम्ही सातत्याने वांगी, टोमॅटो, घेवडा, कांदे अशी विविध पिके घेतलीत. यावेळेस पहिल्यांदाच शेडनेट हाऊसमध्ये रंगीत ढोबळ्या मिरचीचे पीक घेतले असून, ते यशस्वीदेखील झालेत. बाजारभाव टिकून असल्याने पैसेही चांगले मिळालेत. विशेष बाब म्हणजे आमचे एकत्रित कुटुंब असल्याने इतर सर्व भाऊदेखील शेतीत मदत करतात. तसेच शेडनेट हाऊससाठी शासनाचे 75 टक्के अनुदानही मिळाल्याचं शेतकरी माधव नेहे यांनी सांगितलंय.

शेती व्यवसायात सावरगाव तळची वेगळी ओळख- चारही बाजूंनी डोंगरदऱ्यात सावरगाव तळ हे गाव वसलेले आहे. येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. तर दुसरीकडे महिलाही थेट पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये काम करीत असतात. अनेक महिला पाठीवर फवारे घेऊन पिकांवर औषध फवारणीदेखील करतात. याठिकाणी दूध व्यवसायदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सावरगाव तळ या गावाने एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा-

  1. व्याघ्रप्रकल्पात मोबाईलबंदीच्या निर्णयाबाबत मी अजूनही साशंक; वनमंत्री गणेश नाईक यांची स्पष्टोक्ती
  2. ताडोबा ऑनलाइन बुकिंग घोटाळा; आरोपी ठाकूर बंधूंच्या घरी ईडीची धाड

Last Updated : Jan 15, 2025, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.