ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन - PM NARENDRA MODI AT KHARGHAR

नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्‍या (PM Narendra Modi) हस्‍ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 10:28 PM IST

नवी मुंबई : खारघरमध्ये इस्कॉनच्या माध्यमातून एक भव्य दिव्य श्री श्री राधा मनमोहनजी मंदिर उभारलं आहे. इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा 9 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवी मुंबई येथील खारघर येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते करण्यात आलं.

श्री श्री राधा मनमोहन मंदिराची विशेषत : श्री श्री राधा मनमोहनजी मंदिर 9 एकरात स्थापन केलं आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. सफेद संगमरमवरी दगडापासून या मंदिराची निर्मिती केली आहे. वृंदावनच्या बारा जंगलावर आधारित या मंदिर परिसरातील उद्यान बनवले आहे. हे मंदिर आधुनिकता आणि अध्यात्माचा एक संगम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV Bharat)

भारत ही असाधारण अद्भूत भूमी : भारत ही असाधारण आणि अद्भूत भूमी आहे. भारताच्या संस्कृतीला समजायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला अध्यात्म आत्मसात करायला हवं. जे लोक जगाला केवळ भौतिक दृष्टीनं पाहतात, त्यांना भारत त्यातील वेगवेगळ्या भाषा प्रांतांचा समूह आढळून येईल. मात्र, जेव्हा तुम्ही संस्कृती चेतनेशी तुमच्या आत्म्याला जोडता, तेव्हा भारताच्या विराट रुपाचं दर्शन होतं. बंगालच्या धरतीवर चैतन्य महाप्रभू सारखे संत अवतरीत होतात. महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांसारखे संत अवतरीत होतात. चैतन्य महाप्रभूंनी महावाक्य मंत्र सर्वत्र पसरवला, महाराष्ट्रातील संतांनी राम कृष्ण हरी या अध्यात्मिक मंत्रांनी अमृत वाटले. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांच्या गीतेला जनसुलभ बनवले, त्याच पद्धतीने श्री श्री प्रभूपाद्यांनी इस्कॉनच्या माध्यमातून गीतेला लोकप्रिय बनवले. इस्कॉनच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आमच्या सरकारची कामे : "आमचं सरकार आल्यापासून आमच्या माध्यमातून अनेक कामे केली गेली आहेत. यामध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृह बनवणे, प्रत्येक गरीब महिलेला उज्वला गॅसचे कनेक्शन उपलब्ध करुन देणे, प्रत्येक घरात नळ योजना पोचवणे, प्रत्येक गरीबाला पाच लाखापर्यंत मोफत चारांची सुविधा करुन देणे, त्याचबरोबर 70 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, प्रत्येक बेघराला पक्की घरे देणे या सेवाभावाने आणि समर्पणाच्या भावनेने केलेली कार्य माझ्यासाठी महान सांस्कृतिक परंपरेचा प्रसार आहे. हीच कामे सेवाभावी वृत्तीनं आमच सरकार आल्यानंतर केली गेली आहेत," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईत, वाहनधारकांना फटका, 'या' मार्गावरुन वाहतूक बंद
  2. शिवरायांच्या भूमीवरूनच नौदलाला सामर्थ्य दिले जात आहे-नरेंद्र मोदी
  3. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर, तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.