मुंबई: 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये पालकांबद्दल अश्लील प्रश्न विचारणं रणवीर अलाहाबादियाला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंगपासून ते फॉलोअर्स गमावण्यापर्यंतच्या अनेक संकटांना रणवीर आता तोड देत आहे. रणवीरवर एफआयआर दाखल झाल्यानंतर देखील लोक त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. रणवीरनं अलीकडेच एका पोस्टद्वारे सांगितलं की, तो त्याच्या कुटुंबाबद्दल खूप चिंतेत आहे. याशिवाय त्यानं पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून माफी मागितली आहे. सध्या रणबीर त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल खूप घाबरला आहे. पोस्टमध्ये त्यानं सांगितलं की, काही लोक रुग्ण म्हणून आले आणि त्याच्या आईच्या क्लिनिकवर हल्ला केला.
रणवीर अलाहाबादियानं पुन्हा मागितली माफी : रणवीरनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मी आणि माझी टीम पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. सर्व एजन्सी चौकशी करत आणि मी त्याच्यासाठी उपलब्ध आहे. मी माझ्या कुटुंबाला दुखापत होताना पाहत आहे, मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.काही लोक रुग्ण असल्याचं दाखवून त्यांनी माझ्या आईच्या क्लिनिकवर हल्ला केला. मला खूप भीती वाटत आहे. मला काय करावे हे कळत नाही. पण मी पळून जात नाही, मला पोलिसांवर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.' आता याप्रकरणी सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.
रणवीरविरुद्ध एफआयआरही दाखल : आता काही लोक रणवीरच्या विरोधात बोलत आहेत, तर काही त्याच्या बाजूनं बोलत आहेत. एका शोमध्ये रणवीरनं विनोदाच्या नावाखाली एक अश्लील प्रश्न विचारला होता, जो लोकांना अजिबात आवडला नाही. रणवीरविरुद्ध देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रणवीरनं याबद्दल माफी मागितली आहे, तर 'इंडियाज गॉट लेटेंट'चे फाउंडर समय रैनानं त्यांच्या शोचे सर्व भाग यूट्यूबवरून काढून टाकले आहेत. या प्रकरणात समय रैना आणि अपूर्वा मखीजा यांच्याविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा :