मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड, परळीमध्ये वातावरण तापलं आहे. या हत्येतील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर अजूनही यातील एक आरोपी मोकाट आहे. दुसरीकडे यातील मुख्य संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड याला मंगळवारी मकोका अंतर्गत कारवाई होणार, असा निर्वाळा कोर्टानं दिल्यानंतर आज (बुधवारी) कराडला 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावर प्रतिक्रिया उमटत असताना "या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध असल्यामुळे त्यांचा याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेतला पाहिजे होता," असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी भाग पाडायला हवं : बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, "मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका होत असत. हे सगळे सांगताहेत मग अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही? अजित पवार करतात काय? हाच प्रश्न मला पडतो. अजित पवारांनी मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्यायला हवा होता. जर ते घेत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला भाग पडायला हवं होतं. पण तसं होताना आपल्याला दिसत नाहीय," असं अंजली दमानिया यांनी म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.
गुन्हेगार प्रवृत्तीबद्दल बोला : मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली जातेय का? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित करत, याचे उत्तर देखील अजित पवारांनी द्यायला हवे. यांना गरज आहे समजून घ्येण्याची की, "एक तुकाराम मुंडेंसारखी ऑफिसर व्यक्ती पण याच समाजाची आहे. वाल्मिक कराडसारखी माणसं पण याच समाजाची आहेत. तर कुठेतरी या समाजाबद्दल बोलणं तुम्ही बंद करा...., ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं प्रत्येक समाजात असतात. गुन्हेगार प्रवृत्तीबद्दल आपण बोललं पाहिजे. तर समाजाविरोध बोललं नाही पाहिजे," असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :