मुंबई: 'गदर 2' चित्रपटातून धमाका केल्यानंतर, सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सनी देओलबरोबर या चित्रपटात वरुण धवन देखील आहे. दोन्ही स्टार्स त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ भारतीय सैन्यात अधिकाऱ्यांची भूमिका साकारणार आहेत. आज, आर्मी डे निमित्त, सनी आणि वरुण यांनी चित्रपटाच्या सेटवरील पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत. यात ते सैनिकांबरोबर तयारी करताना दिसत आहेत. आज 15 जानेवारी रोजी या दोघांची फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
सनी देओल आणि वरुण व्हायरल : दरम्यान वरुणनं अधिकाऱ्यांबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, 'या आर्मी डे निमित्त भारताच्या खऱ्या नायकांचा सन्मान करत आहे.' त्यांच्यासोबत असल्याचा अभिमान आहे. 'बॉर्डर 2'ची तयारी.' दुसरीकडे सनी देओलनं भारतीय सैनिकांना सम्मान करत पोस्टमध्ये लिहिलं, 'आपल्या वीरांच्या धाडसाला, त्यागाला आणि अढळ समर्पणाला सलाम. भारतीय सैन्य दिनाच्या शुभेच्छा. भारत जिंदाबाद, आर्मी डे.' सनी देओल फोटोमध्ये भारतीय सैनिकांबरोबर उभा असल्याचा दिसत आहे. आता त्याच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय अनेकजण त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
'बॉर्डर'ला 27 वर्षे पूर्ण : 'बॉर्डर 2' मध्ये वरुण धवन आणि सनी देओल दिलजीत दोसांझ व्यतिरिक्त सुनील शेट्टीचा मुलगा अहान हा देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर'चा सीक्वल आहे. 'बॉर्डर'चा 27वा वर्धापन दिन 13 जून रोजी साजरा केला जाईल. 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाची कहाणी निधी दत्ता यांनी लिहिली. आता या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत. तसेच 'बॉर्डर 2' चित्रपटामध्ये सनी पाजीचा रौद्र अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :