मुंबई - Celebs React on Wayanad Landslide:वायनाडमधील भूस्खलनानं संपूर्ण देश हादरला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जणांना प्राण गमवावे लागले. या घटनेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं वायनाड भूस्खलन प्रकरणावर शोक व्यक्त करत तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिलं, "मी हे पाहिलं, माझं मन विदीर्ण झालं. हे भीतीदायक आहे, माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत." वायनाड भूस्खलन प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे.
वायनाड भूस्खलन आणि हावडा-मुंबई ट्रेन अपघातवर चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं केलं दु:ख व्यक्त - Celebs React on Wayanad Landslide - CELEBS REACT ON WAYANAD LANDSLIDE
Celebs React on Wayanad Landslide: वायनाड भूस्खलन आणि हावडा-मुंबई ट्रेन अपघातवर चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. रश्मिका मंदान्ना, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Published : Jul 31, 2024, 2:57 PM IST
चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं केलं दु:ख व्यक्त : या नोटमध्ये तिनं लिहिलं, "मानवी जीवनाचे विनाशकारी नुकसान पाहून मन दुखावलं. केरळ भूस्खलन आणि हावडा-मुंबई रेल्वे अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. एक म्हणजे निसर्गाचे हृदयद्रावक कृत्य. ओम शांती." यानंतर साऊथ अभिनेता विजयनं मंगळवारी वायनाडमध्ये घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली. विजयनं त्याच्या 'एक्स' अकाउंटवर लिहिलं, "केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुःखद बातमी ऐकून खूप दुःख झालं. माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना बचाव आणि मदत सामग्री पुरवावी." तसेच साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारननं याप्रकरणी दु:ख व्यक्त करत लिहिलं, "सतत मुसळधार पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी सुरक्षित आणि सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. सरकारी सूचनांचे पूर्ण पालन करा आणि शक्यतो प्रवास टाळा. नकळत खोट्या बातम्या पसरणार नाहीत, याची काळजी घ्या. वायनाडच्या प्रिय बंधू आणि बहिनींसाठी प्रार्थना."
काय आहे प्रकरण ? : वायनाड भूस्खलनाच्या घटना आणि हावडा-मुंबई रेल्वे अपघात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मंगळवारी वायनाडमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे दरडी कोसळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, वायनाड भूस्खलन दुर्घटनेत किमान 170 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 190 जण जखमी झाले आहेत. भूस्खलनामुळे परिसरातील लोकांना इतर ठिकाणी जावं लागलं आहे. या दोन्ही घटनांनी लोकांची मनं हादरली आहेत.