मुंबई - Ranveer Singh Shaktimaan :90च्या दशकात क्वचितच कोणी असेल, ज्याला टीव्ही सीरियल 'शक्तिमान' बद्दल माहिती नसेल. 'शक्तिमान' हे नाव ऐकल्यावर, सर्वांना अभिनेता मुकेश खन्नाची आठवण होते. 'शक्तिमान' मोठ्या पडद्यावर म्हणजेच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'शक्तिमान' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत असून रणवीर सिंग यात 'शक्तिमान' या सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंग त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 'शक्तिमान'मधून पहिल्यांदाच सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'शक्तिमान' चित्रपटामध्ये रणवीर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळलं होतं. आता अनेक चाहते त्याच्या या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार? : रणवीर सिंगनं 'शक्तिमान'मध्ये सुपरहिरोची भूमिका साकारण्यास होकार दिला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक बासिल जोसेफ करत आहेत. बेसिलला 'मिनल मुरली' (2021) आणि 'फॅमिली' (2023) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जातात. 'बेसिलला भारतीय सुपरहिरो चित्रपटांच्या जगाची चांगली माहिती आहे आणि ते स्वत: शक्तिमानचे मोठे चाहते आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. मुकेश खन्नानं ही व्यक्तिरेखा घराघरात प्रसिद्ध केली होती. 'शक्तिमान' ही एक फ्रँचायझी असणार आहे.