महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रेग्नेंसी फेजमध्ये दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगबरोबर विमानतळावर झाली स्पॉट, फोटो व्हायरल - Ranveer Singh and Deepika Padukone - RANVEER SINGH AND DEEPIKA PADUKONE

Ranveer Singh and deepika padukone : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण विमानतळावर आपल्या सुंदर शैलीत स्पॉट झाले. प्रेग्नेंट असल्यामुळे दीपिकाने तिनं लूज कपडे परिधान केले होते.

Ranveer Singh deepika padukone
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh's picture from recent holiday storms social media(Photo: ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 10:40 AM IST

Updated : May 8, 2024, 12:18 PM IST

मुंबई - Ranveer Singh deepika padukone : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोणची गणना सर्वात लोकप्रिय हिरोइन्समध्ये केली जाते. तिनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिनं तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. ती सप्टेंबर महिन्यात आई होणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. नुकताच दीपिकाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे. तसेच ती फ्लाइटमधून खाली उतरताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता रणवीर सिंग मास्क घातलेल्या पांढऱ्या पोशाखात तिच्या मागे दिसत आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा फोटो झाला व्हायरल : यादरम्यान दीपिका पदुकोणनं तपकिरी रंगाचा लांब लूज फिट टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला होता. लूकला आणखी कूल बनविण्यासाठी तिनं चष्मा घातला होता. दीपिकाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते तिच्या होणाऱ्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या फोटोवरून स्पष्ट होते की, दीपिका आणि रणवीर कुठे तरी एकत्र गेले असावे. दोघे कुठे गेले याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान दीपिकाचा आणखी एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये ती पोलिसाच्या गणवेशात दिसली होती. यावेळी तिचा बेबी बंप दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

या चित्रपटात दीपिका आणि रणवीर दिसणार एकत्र : दीपिका पदुकोण गेल्या वर्षी दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली होती. शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण' मधल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता तिच्याकडे अनेक प्रोजेक्टस् आहेत. सध्या दीपिका गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. दीपिकानं तिच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाचे शूटींग देखील पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून तिची ॲक्शन स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि तिचा पती रणवीर सिंग देखील आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित करत आहे.

हेही वाचा :

  1. श्वेता तिवारीनं तिच्या थायलंडच्या सुट्टीतील हॉट फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर - shweta tiwari share hot pictures
  2. शिखर पहारियाबरोबरच्या तिरुपतीमधील लग्नाच्या अफवांवर जान्हवी कपूरनं दिली प्रतिक्रिया - janhvi kapoor
  3. मेट गालामध्ये आलिया भट्टनं परदेशी भूमीवर फडकवला भारतीय संस्कृतीचा झेंडा, पाहा फोटो - ALIA BHATT MET GALA 2024
Last Updated : May 8, 2024, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details