मुंबई : पंजाबी संगीत उद्योगानं फक्त भारतातच नव्हे तर जगात आपला ठसा उमटवला आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आणि करण औजला यांचे जगभरात चाहते आहेत. दिलजीत 2024मध्ये त्याच्या कॉन्सर्टमुळे खूप चर्तेत होता. त्याचा कॉन्सर्ट हिट ठरला. त्याच्या शोचे तर अनेक चाहत्यांना तिकिट मिळाले नव्हते. आता संगीतप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिलजीत, हनी सिंग आणि करण औजला सारखे प्रसिद्ध गायक 2025मध्ये पुन्हा एकदा चाहत्यांबरोबर धुम करण्यासाठी सज्ज आहेत. यावर्षी नवीन वर्षात होणाऱ्या कॉन्सर्टबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिलजीत दोसांझ : गायक दिलजीत दोसांझ त्याच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टच्या यशामुळे खूप खुश आहे. आता पुन्हा एकदा जर दिलजीतला लाइव्ह ऐकायचं असेल तर, तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. 2025 मध्ये होणाऱ्या दिलजीत 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्टसाठी तिकिट तुम्ही आधीच बुक करू शकता. दिलजीतचा कॉन्सर्ट हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. या शोची तिकिटे 10 ते 12 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असतील. तिकिटांची किंमत 1,499 रुपये ते 12,999 रुपयांपर्यंत असू शकतात.
हनी सिंग : हनी सिंगनं आपल्या धमाकेदार कमबॅकनं सर्वांना आश्चर्यचकित केलंय. वर्षानुवर्षे लाइमलाइटपासून दूर राहिल्यानंतर तो आता पुन्हा एकदा चाहत्याचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ग्लोरी' अल्बमला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. आता हनी सिंग संगीत चार्टवरही हिट ठरला आहे. त्याचं शहनाज गिलबरोबर एक गाणेही येत आहे. अलीकडेच त्यानं 'मिलियनेअर इंडिया टूर' जाहीर केला आहे. त्याचा हा दौरा 10 शहरांमध्ये होईल. फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान त्याचा हा दौरा चालणार आहे. या शोची तिकिट जोमाटो आणि इनसाइडर डॉट इनवर उपलब्ध असेल. आता नुकताच त्याचा 'यो यो हनी सिंग: फेमस' हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे.
करण औजला: गायक करण औजला सध्या त्याच्या 'इट वाज़ ऑल ए ड्रीम' टूरवर आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसह अनेक शहरांमध्ये त्यांचा कॉन्सर्ट आहे. करणनं 31 डिसेंबर रोजी अहमदाबादमधील त्याच्या सुंदर गायकीनं 2024 ची सांगता केली. त्यांची शेवटचा कॉन्सर्ट 5 जानेवारीला हैदराबादमध्ये असेल. या शोची तिकिट 'बुकमायशो' उपलब्ध असेल. या तिकिटांची किंमत 5,999 रुपयांपासून सुरू होत आहे.
सोनू निगम : बॉलिवूड गायक सोनू निगम लवकरच दिल्लीत लाइव्ह परफॉर्म करणार आहे. आपल्या सुरेल आवाजासाठी प्रसिद्ध असलेला हा गायक 8 मार्च 2025 रोजी आपल्या आवाजाची जादू पसरविण्यासाठी सज्ज आहे. सोनूचा हा कॉन्सर्ट कुठे होईल, याबद्दल अद्यापही माहिती समोर आलेली नाही. या कॉन्सर्टची तिकिट तुम्ही 'बुकमायशो'वरून बुक करू शकता. तिकिटांच्या किंमत 499 ते 7,999 रुपयांपर्यंत असणार आहे.
एआर रहमान: संगीतकार एआर रहमान 17 जानेवारी 2025 रोजी सर्व चाहत्यांसाठी कॉन्सर्ट करणार आहे. त्याचा कॉन्सर्ट मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन (BKC) येथे होईल. 'बुकमायशो'वर या शोची तिकिटे 3,000 ते 60,000 रुपयांपर्यंत विकली जात आहे.
एड शीरन : प्रसिद्ध हॉलिवूड गायक एड शीरन देखील इंडिया टूरवर असणार आहे. तो 2025मध्ये भारताला भेट देईल. 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान तो भारतात अनेक शहरांमध्ये कॉन्सर्ट करणार आहे.