ETV Bharat / entertainment

जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं जरुर ऐका, 'सिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं' - JIJAU SONG LAUNCHED

जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं लॉन्च झालं आहे. 'सिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं' हे तमाम माहेरवाशीणींच्या मनातील भावना उलडणारं आहे.

Jijau's song
जिजाऊचं गाणं (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 1, 2025, 4:20 PM IST

Updated : Jan 11, 2025, 3:51 PM IST

मुंबई - 2025 या नव्या वर्षाची सुरुवात एका प्रेरणादायी गीतानं झाली आहे. 'सिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं' हे परभणीच्या कलाकारांनी गायलेलं आणि सादर केलेलं गाणं प्रदर्शित झालंय. स्वराज्यमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचा सह्याद्रीसारखा भक्कम आधार म्हणजे राजमाता जिजाऊ आईसाहेब. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे आणि संस्कारामुळे स्वराज्याची स्थापना झाली. 12 जानेवारीला संपूर्ण जग त्यांची जयंती साजरी करतं. आजच्या आधुनिक युगातील सासूरवाशीण स्त्रीयांनाही 'जिजाऊंचं माहेर' हे आपलं माहेर वाटतं. हीच अंतरीची भावना या सुंदर गीतातून सादर करण्यात आली आहे.

चार घरच्या चौघी एकत्र येऊन माँ जिजाऊंच्या शौर्याची गाथा या गीतातून व्यक्त करताना दिसतात. आपल्या माहेराइतकंच प्रिय त्यांना जिजाऊंच माहेर वाटतं. माहेरच्या वाटेवरुन जाताना त्यांना शिंदखेडच्या वाटेची आठवण होते. अतिशय समर्पक दृष्यातून, आशयपूर्ण काव्यातून या भावना गाण्याच्या व्हिडिओतून मांडण्यात आल्या आहेत. नव्या वर्षाची सुरवात करत असताना या गाण्यातला भाव समजून घेतला तर ती एक चांगल्या संकल्पाची सुरुवात ठरु शकेल.

राजमाता जिजाऊंचं व्यक्तीमत्व इतिहासकार, कादंबरीकार, कवी आणि गीतकारांना प्रेरित करणार आहे. याचं भावनेतून प्रा. डॉ. कल्याण कदम यांनी हे गीत लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. नव्या दमाचा मधुर स्वर लाभेली गायिका संगीता मुळे यांनी हे गीत गायलंय. या गीताचा सुंदर व्हिडिओ यूट्यबरवर अपलोड करण्यात आलाय. हे गाणं वैष्णवी अंभोरे, योगिता राऊत, अनुजा मुकडे आणि किरण मुळे या कलाकारांवर चित्रीत करण्यात आलं असून याचं कलादिग्दर्शन बाबा डांगे यांनी केलंय. तर अमोल मोरे, माऊली पाथरकर, सुभाष जोगदंड या वाद्यवृंदांनी या गाण्याला सजवलंय. विशेष म्हणजे परभणीतील हरिष आणि प्रथम शहाणे यांनी प्रफुल्ल म्यूझिक स्टुडिओत याचं रेकॉर्डिंग केलंय. नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथील प्राचार्य डॉ. विजय कानवटे यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या या गीताची निर्मिती खोपा क्रिएशनच्या आशा कल्याण कदम यांनी केली आहे.

Last Updated : Jan 11, 2025, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.