मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर आज 1 जानेवारी रोजी त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म रायगड येथे मुरुड-जंजिराला झाला असून नाना पाटेकर यांचं पूर्ण नाव, विष्णनाथ गजानन पाटेकर आहे. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. 2013 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय. नाना पाटेकर अभिनयासाठीचं नाही तर चित्रपट निर्मिती आणि पटकथा लेखनासाठीही प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या विषयी काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.
नाना पाटेकर यांचा जन्म : नाना पाटेकर यांचा जन्म 1951 साली झाला. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कठीण काळात केली. वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांनी काम करणे सुरू केले. आज हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या नावावर अनेक अप्रतिम चित्रपट आहेत. दरम्यान सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टमध्ये नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं की, ते संघर्षाच्या काळ फक्त दिवसातून एकदा जेवण करत होते. त्यांची फक्त 35 रुपये महिन्याची कमाई होती. आज त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे. त्यांनी त्याच्या करिअरची सुरुवात 'गमन' या चित्रपटातून केली होती. ते या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. यानंतर 1986 मध्ये त्यांना पहिल्यांदा यश मिळाले, त्यांचा 'अंकुश' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला. या चित्रपटामधील त्यांचा अभिनय हा खूप सुंदर होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
नाना पाटेकरचे प्रसिद्ध चित्रपट : नाना पाटेकर यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 'तिरंगा', 'परिंदा', 'क्रांतीवीर', 'खामोशी' आणि 'भूत ' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. नाना पाटेकर यांच्या डायलॉग डिलिव्हरीमुळे अनेकांना त्याचा अभिनय खूप विशेष वाटत होता. त्यांचे काही डायलॉग आता देखील अनेकजण कॉपी करतात. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. दरम्यान 'वेलकम' चित्रपटातमधील त्यांची उदय शेट्टीची भूमिका ही प्रचंड गाजली होती. या चित्रपटामधील देखील त्यांचे डायलॉग खूप प्रसिद्ध झाले होते. 'वेलकम' चित्रपटामध्ये उदय शेट्टी आणि मजनू भाई (अनिल कपूर )ची जोडी चाहत्यांना खूप पसंत पडली होती. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसला होता. याशिवाय नाना पाटेकर यांचा 'टॅक्सी नंबर 9211' हा चित्रपट देखील अनेकांना पसंत पडला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार अभिनय केला होता. 2016 मध्ये नाना पाटेकर यांनी 'नटसम्राट' हा मराठी चित्रपट केला होता. या चित्रपटामधील त्यांचा अभिनय अनेकांना आवडला होता.
कारगिल युद्धात योगदान : 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, त्यांनी आपली अभिनय कारकीर्द सोडून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटसह युद्धात योगदान दिलं होत. यानंतर त्यांचं अनेकांनी कौतुक केलं होतं. दरम्यान अनिल शर्मा दिग्दर्शित नाना पाटेकर यांचा 'वनवास' चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :