महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं 'बिग बॉस 17'च्या अंतिम फेरीपूर्वी मन्नारा चोप्राला दिला पाठिंबा - विकी जैनच्या हकालपट्टी

Bigg Boss 17 Finale : 'बिग बॉस 17' या शोचा फिनाले हा लवकरच होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात फक्त 5 स्पर्धक आहेत. यामध्ये प्रियांका चोप्राची बहिण मन्नारा चोप्रा देखील आहे. दरम्यान देसी गर्लनं मन्नारासाठी एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Bigg Boss 17 Finale
बिग बॉस 17 फिनाले

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 6:33 PM IST

मुंबई Bigg Boss 17 Finale : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा सीझन फिनाले जवळ येत आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. आता 'बिग बॉस 17'च्या फिनालेची तारीखही समोर आली आहे. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा देखील बिग बॉस 17 च्या अंतिम फेरीत टॉप 5 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये आहे. प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर तिच्या चुलत बहिणीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रियांका चोप्रानं दिला मन्नाराला पाठिंबा : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिसमधील तिच्या सासरच्या घरी 'बिग बॉस 17'चा आनंद घेत आहे. बिग बॉसच्या फिनालेमध्ये बहिण मन्नाराला पाठिंबा देत प्रियांकानं इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मन्नाराचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये प्रियांका चोप्रानं तिच्या धाकट्या बहिणीसाठी प्रोत्साहन देत लिहिलं, 'तुमचे सर्वोत्तम द्या आणि मागे काय झालं आहे ते विसरून जा', यासोबत प्रियांकानं रेड हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. बिग बॉसच्या घरात मन्नारा चोप्राबरोबर मुन्नावर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण महाशेट्टी आणि अभिषेक कुमार हे स्पर्धेत आहेत. काल रात्रीच्या एपिसोडमधून विकी जैनचं नाव आल्यानंतर त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे.

विकी जैनची हकालपट्टी : विकी गेल्यानंतर अंकिता खूप रडली. तसंच अंकितानं रडत रडत विकीला स्पष्टपणे सांगितलं की बाहेर जाऊन पार्टी करू नकोस. दरम्यान, विकी जैनचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विकी सना आणि ईशासोबत पार्टी करताना दिसत आहे. याशिवाय विकीनं या पार्टीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहेत. विकीच्या घराबाहेर पडण्यामुळे अंकिताही खूप दुःखी आहे. 'बिग बॉस 17' फिनालेची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत. या शोमध्ये आता घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. 'बिग बॉस 17'मध्ये ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे काही दिवसात कळेल.

हेही वाचा :

  1. बॉबी देओलनं पत्नी तान्या देओलसोबतचा सुंदर फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. अजय देवगण स्टारर हॉरर चित्रपट 'शैतान'ची रिलीज डेट जाहीर
  3. सारा अली खाननं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट; पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details