मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट अखेर 17 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक माहिती समोर आली आहे. कंगनाचा हा चित्रपट बांग्लादेशात प्रदर्शित होणार नाही. बांग्लादेशमध्ये या चित्रपटावर बंदी घातलण्यात आली आहे. यामागील कारण म्हणजे बांग्लादेश आणि भारताचे बिघडणारे संबंध आहे. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटाला दोन्ही देशांमधील तणावाचा फटका सहन करावा लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेशमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाच्या आशयामुळे नव्हे तर दोन्ही देशांमधील तणावामुळे बंदी घातली जात आहे.
'इमर्जन्सी' चित्रपटावर बांग्लादेशात बंदी : 'इमर्जन्सी' चित्रपट 1975 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये बांग्लादेशाला कसं स्वातंत्र मिळलं हे देखील दाखविण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बांग्लादेशाला स्वातंत्र मिळून देण्यासाठी खूप मोठा वाटा आहे. 'इमर्जन्सी'मध्ये 1971च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारतीय सैन्य आणि इंदिरा गांधी सरकारनं महत्वाची भूमिका निभावली होती, हे देखील चित्रपटात दाखवलं गेलं आहे. बांग्लादेशातचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांना मिळालेल्या पाठिंब्याचे चित्रण यात आहे. त्यांनी इंदिरा गांधींना देवी दुर्गा म्हटलं होतं. या चित्रपटात बांग्लादेशातील अतिरेक्यांनी शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केल्याचेही दाखविण्यात आलं आहे, ज्यामुळे बांगलादेशात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली, असं म्हटलं जात आहे.
'इमर्जन्सी'ची स्टार कास्ट : कंगना राणौतच्या या चित्रपटाबाबत यापूर्वीही बराच वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट 2024मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता. 'इमर्जन्सी' चित्रपटातील काही दृश्यांवर काँग्रेसनेही आक्षेप घेतला होता. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये कंगना राणौतनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिनं या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, पुपुल जयकर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा :