महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहरुख खान सेंस ऑफ ह्यूमर जबरदस्त, वाचा सुंदर विनोद - SHAH RUKH KHANS COMEDY STYLE

शाहरुख खानला त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखल्या जाते. आता त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात तो विनोद करताना दिसत आहे.

Shah Rukh Khan
शाहरुख खान (शाहरुख खान (IANS-ETV Bharat))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 18, 2024, 5:31 PM IST

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान चित्रपटांसाठी तसेच त्याच्या अप्रतिम विनोदी अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनेक प्रसंगी शाहरुख खाननं प्रश्न विचारणाऱ्यांना काही सेकंदातच गप्प केलंय, मग ते पत्रकार असो वा कोणीही. शाहरुख कोणत्याही मुद्द्यावर आपले मत स्पष्टपणे मांडत असतो. आता सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, यात त्यानं अतिशय विनोदी विधान केलंय. शाहरुखला एका पत्रकारानं कतरिनासोबतच्या रोमांन्सवर प्रश्न केला असता त्यानं म्हटलं, "मला सर्व गोष्टी करण्यासाठी फोर्स केले जाते. लोक माझ्याबरोबर जबरदस्ती करतात आणि म्हणतात की, तू मुलींना मीठी मारायला हवी. मला हे सर्व नाही करायचे असते. माझ नशीब खूप वाईट आहे, की मला सुंदर मुलीबरोबर रोमांन्स करावा लागतो. यानंतर मला याबद्दलचे पेमेंट देखील घ्यावी लागते. असं पण काही आयुष्य आहे का ? जर तुमच्याबरोबर असं झालं तर, तुम्हाला कसं वाटेल." यावर तिथे उपस्थित असलेले लोक हसतात.

'निवृत्ती घ्या' यावर शाहरुखचं उत्तर : शाहरुख लोकार्नोच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता, जिथे त्यानं स्पष्टपणे सांगितलं की आजकाल काही मस्तीमध्ये बोलणं देखील जमत नाही, लोकांना लवकरच वाईट वाटते. दरम्यान 2017 पासून शाहरुखचा कठिण काळ सुरू होता. यानंतर 2023च्या सुरुवातीला त्याचा 'पठाण' चित्रपट आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी, शाहरुख खान ट्विटरवर आस्क मी एनीथिंग सेशन ( AskMeAnythingSession) घेतलं होतं. यामध्ये त्याच्याबरोबर त्याचे चाहते कनेक्ट झाले होते. या सेशनमध्ये एका युजरनं लिहिलं होतं की,'पठाण' डिजास्टर होईल, रिटायरमेंट घेऊन घे.' यावर त्यानं खूप हुशारीनं उत्तर दिलं होतं की, 'बेटा मोठ्यांशी असं बोलू नये.'

शाहरुख खान पुढच्या आयुष्यात काय बनणार? : एकदा एका रिपोर्टरनं शाहरुख खानला विचारलं की, त्याला पुढील आयुष्यात काय बनायला आवडेल? यावर शाहरुखनेच रिपोर्टरला विचारले की, "पुढच्या आयुष्यात तू काय बनशील?" रिपोर्टरनं यावर म्हटलं, "मी पुढच्या आयुष्यात शाहरुख खान बनणार आहे." यानंतर शाहरुख खान देखील उत्तर दिलं की, "पुढच्या आयुष्यात मीही शाहरुख खान बनणार आहे."

अनुष्का शर्मालाही सोडले नाही : 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका महिला रिपोर्टरनं अनुष्का शर्माला विचारलं की, "मॅडम, तुम्ही बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरू केला होता, आता लग्नाचा हंगाम आला आहे, तुम्हाला तुमच्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला आवडेल का?" दरम्यान, शाहरुख खान व्यत्यय आणून म्हणतो, "लग्न आमच्या पूर्वजांच्या काळापासून सुरू आहे, तिनं (अनुष्का) याची सुरुवात कशी केली, ते लग्न करतील, मजा करतील." यावर तिथे हजर असलेले लोक हसायला लागतात. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'किंग ' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खानला भेटून जॉन सीना झाला रोमांचित, केली पोस्ट शेअर - John cena and shahrukh khan
  2. शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर 'किंग'चं होणार लंडनमध्ये शूटिंग... - Shah rukh Khan and Suhana Khan
  3. मन्नतच्या बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांना दिसला ईदचा चाँद, पाहा व्हिडिओ - Shahrukh Khan Eid

ABOUT THE AUTHOR

...view details